news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड राष्ट्रनिष्ठा आणि प्रखर समाजसेवेचा संगम! पिंपरी पालिकेत ‘आझाद हिंद’च्या नायकासह ‘हिंदुहृदयसम्राटां’चा जागर

राष्ट्रनिष्ठा आणि प्रखर समाजसेवेचा संगम! पिंपरी पालिकेत ‘आझाद हिंद’च्या नायकासह ‘हिंदुहृदयसम्राटां’चा जागर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; महान नेत्यांच्या स्मृतींना प्रशासनाकडून विनम्र अभिवादन. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नेताजींचे विचार आणि बाळासाहेबांचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक; अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांचे प्रतिपादन


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २४ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला लढा, त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रखर विचारांनी आणि सामाजिक जाणीवेतून समाजातील सर्व घटकांना आत्मसन्मान मिळवून दिला,” असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी काढले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना विक्रांत बगाडे म्हणाले की, नेताजींच्या विचारांतून कर्तव्यभावना आणि देशसेवेची जाणीव निर्माण होते. तर बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभावी संवादाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे मोठे कार्य केले असून त्यांच्या कार्यातून समाजाला जबाबदारीची जाणीव झाली आहे.

या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!