news
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्लारस्ते अपघात पीडितांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कडक पाऊल; विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याच्या योजनेचा विचार करण्याचे निर्देशपरदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधीपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणकासांगवीत ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि विविध गुणगौरव सोहळा उत्साहात; ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा महासंघाचा ठाम निर्धार
Home पिंपरी चिंचवड पिंपरी शिवसेनेत ठिणगी! खा. बारणेंनी निष्ठावंतांना सारले बाजूला; गटनेतेपदावरून पक्षात अंतर्गत संघर्षाची चिन्हे

पिंपरी शिवसेनेत ठिणगी! खा. बारणेंनी निष्ठावंतांना सारले बाजूला; गटनेतेपदावरून पक्षात अंतर्गत संघर्षाची चिन्हे

सहा नगरसेवकांमध्ये अनुभवापेक्षा रक्ताच्या नात्याला प्राधान्य; ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसणार? (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सुलभा उबाळेंना डावलून पुत्राला झुकते माप; खासदार श्रीरंग बारणेंच्या ‘पुत्रप्रेमा’मुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता!


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २४ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अवघ्या सहा जागांवर बोळवण झालेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) गटनेते निवडीत अखेर अपेक्षेप्रमाणे ‘पुत्रप्रेमा’चा विजय झाला आहे. पक्षातील अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या आणि ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांचा दावा डावलून खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले सुपुत्र आणि प्रथमच निवडून आलेले विश्वजित बारणे यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घातली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर असून, निष्ठावंतांपेक्षा घराणेशाहीला महत्त्व दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शनिवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर उपस्थित होते. वास्तविक पाहता, सुलभा उबाळे या महापालिकेतील अत्यंत अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वी अनेकदा आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली आहे. मात्र, नवनिर्वाचित ६ नगरसेवकांमध्ये स्वतःच्या कुटुंबाचे वर्चस्व राखण्यासाठी खासदार बारणेंनी चक्रव्यूह रचून उबाळेंना बाजूला सारल्याचे बोलले जात आहे.

विश्वजित बारणे यांनी प्रभाग २४ मधून भाजपच्या सिद्धेश्वर बारणे यांचा पराभव करत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. युवा संघटन आणि पश्चिम महाराष्ट्रातील जबाबदारीचा अनुभव त्यांच्या पाठीशी असला, तरी महापालिका सभागृहाचा कोणताही अनुभव नसताना थेट गटनेतेपद मिळाल्याने ‘घराणेशाही’चा शिक्का अधिक गडद झाला आहे. निलेश बारणे, निलेश तरस, ऐश्वर्या तरस आणि रेश्मा कातळे या नगरसेवकांनी जरी संमती दर्शवली असली, तरी पडद्यामागे या निवडीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विश्वजित बारणे यांनी “सभागृहात शिवसेनेचा आवाज दिसेल,” असा दावा केला असला, तरी तो आवाज फक्त बार्णे कुटुंबाचाच असणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपला ८४ जागांचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे विरोधी पक्षात प्रभावी काम करण्यासाठी अनुभवाची गरज असते, तिथे विश्वजित बारणे यशस्वी होतात की खासदार वडिलांच्या छत्रछायेखालीच राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

खासदार श्रीरंग बारणे यांनी या निवडीचे समर्थन केले असले, तरी सुलभा उबाळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेतृत्वाला डावलण्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला सोसावे लागण्याची भीती काही कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!