news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पुणे पुण्यात राजकीय वातावरण तापले! गिरीश महाजन यांच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करण्याची मागणी; बंडगार्डन परिसरात जोरदार निदर्शने

पुण्यात राजकीय वातावरण तापले! गिरीश महाजन यांच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करण्याची मागणी; बंडगार्डन परिसरात जोरदार निदर्शने

नाशिकमधील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप; मंत्री महाजन यांच्या राजीनाम्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गिरीश महाजन यांच्या ‘त्या’ विधानाचा पुण्यात तीव्र निषेध; वंचित बहुजन आघाडीचे बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन


पुणे/पिंपरी, प्रतिनिधी: बालाजी नवले, २७ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे : नाशिक येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले असून, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

प्रजासत्ताक दिनीच संविधानाच्या शिल्पकाराचा विसर पडणे ही अनावधानाने झालेली चूक नसून, ही भाजपची विशिष्ट वैचारिक मानसिकता आहे, अशी घणाघाती टीका आंदोलनादरम्यान करण्यात आली. नाशिकमध्ये एका महिला कर्मचाऱ्याने महाजन यांना यावरून जाब विचारल्यानंतर आता पुण्यात राजकीय वातावरण तापले असून गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी केले. यामध्ये खालील मान्यवर सहभागी झाले होते:

  • अरविंद तायडे: शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पुणे.

  • सागर आल्हाट: शहराध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे.

  • अविनाश लहाडे: उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे.

  • अक्षय कांबळे: पुणे शहर संघटन, वंचित बहुजन आघाडी.

आंदोलनकर्त्यांनी गिरीश महाजन आणि महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी मागणी केली की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.

युवा शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी इशारा दिला की, सरकारने यावर त्वरित कठोर पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात संपूर्ण पुणे शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलनानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सदर आंदोलन करता पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व आंदोलन करते उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!