news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “प्रलंबित प्रश्न न सुटल्यास हायकोर्टात जाणार!” रेल्वे अर्थसंकल्पाने पुणेकर प्रवाशांची निराशा केल्याचा प्रवासी संघाचा आरोप

“प्रलंबित प्रश्न न सुटल्यास हायकोर्टात जाणार!” रेल्वे अर्थसंकल्पाने पुणेकर प्रवाशांची निराशा केल्याचा प्रवासी संघाचा आरोप

बंद पडलेल्या गाड्या आणि एक्सप्रेस थांब्यांसाठी स्वाक्षरी मोहीम; गुलाम अली भालदार यांचा रेल्वे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुणे-लोणावळा प्रवाशांच्या समस्यांकडे रेल्वेचे दुर्लक्ष; चिंचवड प्रवासी संघाचा अर्थसंकल्पावर निषेध


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील, विशेषतः पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मूलभूत मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार यांनी अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध केला आहे.

पुणे-लोणावळा दरम्यानच्या ६४ किलोमीटर रेल्वे मार्गावर सव्वा लाख प्रवाशांची दररोज चढ-उतार होते. १९९० सालापासून या मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली जात आहे. “तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका झाल्याशिवाय लोकलच्या फेऱ्या वाढवता येणार नाहीत,” असे रेल्वे प्रशासन वारंवार सांगते. मात्र, राज्य सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये या ५१०० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देऊनही अर्थसंकल्पात अपेक्षित गती दिसून आली नाही.

१. लोकल फेऱ्यांत वाढ: सध्या दुपारी ११ ते ३ या वेळेत एकही लोकल उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, महिला आणि कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबईच्या धर्तीवर १५ डब्यांची लोकल सुरू करण्याची गरज आहे.

२. रावेत येथे नवीन स्थानक: आकुर्डी आणि देहूरोड दरम्यान ‘रावेत’ हे नवीन रेल्वे स्थानक निर्माण करावे. येथील दीड लाख लोकसंख्येसाठी हे स्थानक अत्यंत सोयीचे ठरेल.

३. बंद गाड्या सुरू करा: कोरोना काळापासून बंद असलेल्या सह्याद्री एक्सप्रेस, पुणे-भुसावळ एक्सप्रेस आणि बारामती-कर्जत पॅसेंजर त्वरित सुरू कराव्यात.

४. चिंचवडला एक्सप्रेस थांबा: कोकण, हैदराबाद, बेंगलोर आणि मद्रास मार्गावरील महत्त्वाच्या गाड्यांना चिंचवड स्थानकावर थांबा दिल्यास पुणे स्थानकावरील ताण कमी होईल.

५. नवीन मार्ग: चिंचवड-रोहा आणि पुणे-तळेगाव-चाकण-नाशिक या नवीन रेल्वे मार्गांना गती द्यावी.

“आम्ही आजवर मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि अधिकाऱ्यांना शेकडो निवेदने दिली, आंदोलने केली. तरीही रावेत स्थानक आणि चौपदरीकरणाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू,” असा इशारा गुलाम अली भालदार यांनी दिला आहे. यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निषेध मोहिमेत नारायण भोसले, ॲड. मीना अग्रवाल, मुकेश चुडासमा, निर्मला माने, संभाजी बारणे, रजिना फ्रान्सिस, वैशाली मिडगुले यांच्यासह इतर पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!