पिंपरी चिंचवड महापालिकेत संत सेवालाल महाराज यांना अभिवादन! उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , १६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, “संत सेवालाल महाराज यांनी समाजात समता, सेवा, नैतिकता आणि बंधुभावाचे महान संस्कार रुजविले आहेत. त्यांच्या विचारांनी केवळ बंजारा समाजालाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला नवी दिशा दिली आहे. त्यांनी आयुष्यभर दिलेला सामाजिक ऐक्य आणि जनसेवेचा संदेश आजही समाजासाठी अत्यंत प्रेरक आहे.”
या अभिवादन सोहळ्याप्रसंगी उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, उप अभियंता संजय जाधव उपस्थित होते.
तसेच बंजारा समाजातील पदाधिकारी व नागरिकांमध्ये नितीन चव्हाण, रावसाहेब राठोड, रमेश राठोड, अविनाश राठोड, रवि राठोड, रोहित चव्हाण, किशोर चव्हाण, सुभाष चव्हाण, रघुनाथ चव्हाण, कार्तिक पवार, अमोल पवार, बालाजी राठोड, दिलीप आडे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

