news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी!” लहुजी वस्तादांच्या क्रांतीगर्जनेचा महापालिकेत जागर; महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न

“जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी!” लहुजी वस्तादांच्या क्रांतीगर्जनेचा महापालिकेत जागर; महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न

स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतीपर्वाचे महापौरांनी केले स्मरण; वासुदेव बळवंत फडके यांच्या शौर्याला मानवंदना, प्रशासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींची मोठी उपस्थिती. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

क्रांतिवीर लहुजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या देशभक्तीचा वारसा जोपासूया! महापौर रवि लांडगे यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिपादन


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी” ही क्रांतीगर्जना करणारे थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे सहकारी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी देशभक्तीची ऊर्जा देणारे प्रेरणास्थान आहे, अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी दोन्ही महापुरुषांना मानवंदना दिली.

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज विविध ठिकाणी अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड स्टेशन येथील दोन्ही क्रांतिकारकांच्या पुतळ्यास तसेच महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमांना महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर लांडगे म्हणाले की, “क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे हे केवळ युद्धनीतीत निपुण नव्हते, तर त्यांनी हजारो क्रांतिकारकांची फळी निर्माण करून इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. त्यांना साथ देणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांनी परकीय सत्तेविरुद्ध बंडाचे निशाण फडकवून स्वातंत्र्याच्या विचारांना नवे बळ दिले. या दोन्ही महापुरुषांचे कार्य देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले असून, त्यांचा त्याग पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

या अभिवादन सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, नितीन घोलप, संजय धुतडमल, राजू आवळे, भाऊ कसबे, बाळासाहेब रसाळ, शिवाजी खडसे, रवींद्र वाघमारे, नाना कांबळे, नामदेव रिटे, मारुती सोनटक्के, बाळासाहेब खंदारे, अनिकेत साळवे, जितेंद्र मोटे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!