news
पिंपरी-चिंचवडकरांची लाडकी ‘पवनाथडी’ यंदा सांगवीत! महिला उद्योजिकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ“गातो शिवरायांचे गुणगान जी..जी..जी..!” निगडीत १४ दिग्गज शाहिरांची अनोखी मानवंदना; शौर्यगाथेने रसिक मंत्रमुग्ध“जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी!” लहुजी वस्तादांच्या क्रांतीगर्जनेचा महापालिकेत जागर; महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न“औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध!” महापौर रवि लांडगे यांची ग्वाही; पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनकडून विशेष सन्मान“निर्णयक्षमता आणि शिस्तीचे प्रतीक हरपले!” अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी; बहुजन विकास आघाडीकडून आदरांजली
Home पिंपरी चिंचवड “गातो शिवरायांचे गुणगान जी..जी..जी..!” निगडीत १४ दिग्गज शाहिरांची अनोखी मानवंदना; शौर्यगाथेने रसिक मंत्रमुग्ध

“गातो शिवरायांचे गुणगान जी..जी..जी..!” निगडीत १४ दिग्गज शाहिरांची अनोखी मानवंदना; शौर्यगाथेने रसिक मंत्रमुग्ध

शाहिरी कडाडली, तुतारी दुमदुमली! निगडीत शिवविचारांचे नवचैतन्य; 'विचार प्रबोधन पर्वा'त शाहिरांनी शब्दांतून उभा केला शिवरायांचा देदीप्यमान कालखंड. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

डफावर पडली थाप आणि निगडीचा परिसर झाला शिवमय! १४ शाहिरांनी ओजस्वी वाणीतून साकारला स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “गातो शिवरायांचे गुणगान जी..जी..जी..” अशा दमदार ललकारीने आणि डफावर पडणाऱ्या थापेने निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प परिसर अक्षरशः शिवमय झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत काल १४ नामवंत शाहिरांनी आपल्या ओजस्वी स्वरांतून छत्रपती शिवाजी महाराज यांना आगळीवेगळी मानवंदना अर्पण केली.

या विशेष कार्यक्रमात शिवजन्मोत्सवापासून ते थेट राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा गौरवशाली इतिहास शाहिरांनी आपल्या पहाडी आवाजात आणि प्रेरणादायी सादरीकरणातून उलगडला. या माध्यमातून स्वराज्याची शौर्यगाथा आणि राष्ट्रभक्तीची ज्योत नागरिकांच्या मनामनात प्रज्वलित झाली.

या ऐतिहासिक सोहळ्यात खालील १४ दिग्गज शाहिरांनी आपला कलाविष्कार सादर केला:

  • शाहीर प्रकाश ढवळे, शाहीर अशोक कामथे, शाहीर बाळासाहेब मालुसकर, शाहीर चैतन्य काजुळकर.

  • शाहीर जालिंदर शिंदे, शाहीर लीना देशपांडे, शाहीर वनिता मोहिते, शाहीर कांचन जोशी.

  • शाहीर प्रचिती विष्णूरकर, शाहीर स्मिता बांदिवडेकर, शाहीर चित्रा कुलकर्णी, शाहीर उज्ज्वला जाधव.

  • शाहीर राजरत्न पांडगळे आणि शाहीर घनश्याम कुदळे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर, निलेश शिंदे, मारुती भापकर, प्रकाश जाधव, संतोष सातपुते, आबासाहेब ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच दुर्गा संजीवनी सामाजिक संस्थेचे बापूसाहेब कुतवळ, निलेश धावडे, राज साबळे, नामदेव धिंडले आणि शहरातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाहिरीच्या सशक्त शब्दांमधून स्वराज्य, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत या कार्यक्रमाने नागरिकांच्या मनामनांत शिवविचारांचे नवचैतन्य निर्माण केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!