news
निष्काम कर्मयोग्याचा मूर्तिजापुरात जागर! स्मारकासाठी दातृत्वाचा ओघ; १० दिवसांच्या स्वच्छता आणि भक्ती उत्सवाची महाप्रसादाने सांगताप्रशासकीय काळातील उधळपट्टीनंतर नव्या अध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर; बारणे घराण्याचा राजकीय वारसा की जगताप गटाचे वर्चस्व? पिंपरी-चिंचवडच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कोणाचा ‘राज्याभिषेक’ होणार?स्वराज्याच्या रक्षकाचा सांगवीत जागर! ज्येष्ठ समाजसेवक महेशशेठ भागवत यांच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव’ सोहळ्याचे शानदार आयोजन“कॅन्सरच्या चौथ्या स्टेजलाही नमवले!” तळेगावच्या डॉक्टरांनी वाचवले ६३ वर्षीय रुग्णाचे स्वरयंत्र; आधुनिक हेलिकल टोमोथेरपीचा यशस्वी प्रयोगशिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि सुशासन आजही प्रेरणादायी! व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधन; महापालिकेच्या ‘विचार प्रबोधन पर्वा’ला मिळतोय उदंड प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड स्वराज्याच्या गौरवगाथेने न्हाऊन निघाली औद्योगिक नगरी! महापौरांसह खासदारांची शिवस्मारकांना मानवंदना; उपमहापौरांचा प्रभागनिहाय अभिवादन दौरा

स्वराज्याच्या गौरवगाथेने न्हाऊन निघाली औद्योगिक नगरी! महापौरांसह खासदारांची शिवस्मारकांना मानवंदना; उपमहापौरांचा प्रभागनिहाय अभिवादन दौरा

शहरात 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष; पिंपरी, भोसरी ते निगडीपर्यंत शिवप्रेमींचा महासागर, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून महाराजांना मानाचा मुजरा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘छत्रपती शिवाजी महाराज सुशासनाचे तेजस्वी प्रतीक!’ पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंतीचा उत्साह; महापौर रवि लांडगे यांनी केले शिवरायांना अभिवादन

 


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते, तर ते स्वराज्य, लोककल्याण, न्याय आणि सुशासनाचे तेजस्वी प्रतीक होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही आपल्याला आत्मसन्मान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देते,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध शिवस्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महापौर रवि लांडगे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर भोसरी येथील पी.एम.टी चौक, लांडेवाडी चौक आणि पिंपरीतील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर:

अभिवादन प्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे उपस्थित होते. तसेच प्रशासकीय अधिकारी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, भक्ती शक्ती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी शहरातील पश्चिम आणि दक्षिण भागातील शिवस्मारकांना भेटी देऊन अभिवादन केले. यामध्ये निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान, चिंचवडचे प्रेमलोक पार्क, थेरगावमधील डांगे चौक व गावठाण, रहाटणी, पिंपरी वाघेरे, कासारवाडी मनपा शाळा, दापोडी आणि फुगेवाडी येथील पुतळ्यांचा समावेश होता. यावेळी नगरसेवक संजय काटे, राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे, सविता खुळे, अर्चना तापकीर, आरती चौंधे, प्रतीक्षा जवळकर व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

शहरातील इतर महत्त्वाच्या चौक आणि स्मारकांवरही महापालिका प्रशासनाच्या वतीने अधिकारी उपस्थित होते. मोहननगर, चिंचवड येथे क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांनी तर मोशी येथील पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांनी पुष्पहार अर्पण करून शिवरायांना मानाचा मुजरा केला. संपूर्ण शहर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आणि भगव्या झेंड्यांनी न्हाऊन निघाले होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!