news
निष्काम कर्मयोग्याचा मूर्तिजापुरात जागर! स्मारकासाठी दातृत्वाचा ओघ; १० दिवसांच्या स्वच्छता आणि भक्ती उत्सवाची महाप्रसादाने सांगताप्रशासकीय काळातील उधळपट्टीनंतर नव्या अध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर; बारणे घराण्याचा राजकीय वारसा की जगताप गटाचे वर्चस्व? पिंपरी-चिंचवडच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कोणाचा ‘राज्याभिषेक’ होणार?स्वराज्याच्या रक्षकाचा सांगवीत जागर! ज्येष्ठ समाजसेवक महेशशेठ भागवत यांच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव’ सोहळ्याचे शानदार आयोजन“कॅन्सरच्या चौथ्या स्टेजलाही नमवले!” तळेगावच्या डॉक्टरांनी वाचवले ६३ वर्षीय रुग्णाचे स्वरयंत्र; आधुनिक हेलिकल टोमोथेरपीचा यशस्वी प्रयोगशिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि सुशासन आजही प्रेरणादायी! व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधन; महापालिकेच्या ‘विचार प्रबोधन पर्वा’ला मिळतोय उदंड प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकले ‘पल्सर’स्वार चोरटे! दिघी, पिंपरी, निगडीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकले ‘पल्सर’स्वार चोरटे! दिघी, पिंपरी, निगडीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचा धडाका; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, अट्टल गुन्हेगार गणेश गिरीसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई! बीडमधील सराईत टोळी गजाआड; २५० सीसीटीव्ही तपासले अन् चैन स्नॅचिंगचे ४ गुन्हे उघड


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी, पिंपरी, निगडी आणि चिखली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या चैन स्नॅचिंग टोळीचा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. बीड जिल्ह्यातील सराईत आरोपी गणेश भारत गिरी याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिघी आणि पिंपरी भागात पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते आणि त्यांच्या पथकाने आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा गुन्हा बीडमधील सराईत गुन्हेगार गणेश गिरी यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

आरोपी गणेश गिरी याच्या सखोल तपासातून पिंपरी-चिंचवडमधील खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:

  • पिंपरी पोलीस स्टेशन: जबरी चोरीचा गुन्हा (७२/२०२५)

  • दिघी पोलीस स्टेशन: मंगळसूत्र चोरीचा गुन्हा (६१/२०२६)

  • निगडी पोलीस स्टेशन: चैन स्नॅचिंग प्रकरण (७५५/२०२५)

  • चिखली पोलीस स्टेशन: जबरी चोरीचा गुन्हा (८६९/२०२५)

जप्त केलेला मुद्देमाल:

  • सोने: २८ ग्रॅम ५०० मिली वजनाचे दागिने (किंमत ४ लाख १० हजार रु.)

  • वाहन: गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल (किंमत १ लाख ५० हजार रु.)

तपासात असे समोर आले की, गणेश गिरी याने आपले साथीदार रोहन राजू जाधव (बीड), पंकज गणेश दिवटे (बीड), सुमित सोपान चव्हाण (चाकण) आणि ओमकार रामेश्वर लाटे (बीड) यांच्या मदतीने हे गुन्हे केले होते. पोलिसांनी चाकणमधून सुमित सोपान चव्हाण यालाही ताब्यात घेऊन चिखली पोलिसांच्या हवाली केले आहे. मुख्य आरोपी गणेश गिरी हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर बीड आणि पुणे शहरात खुनाचा प्रयत्न (३०८), दरोडा आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्हा पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाईही केली होती.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, स.पो.नि. पांडुरंग देवकाते आणि मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, पवन वाजे, मोहसिन आत्तार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!