news
निष्काम कर्मयोग्याचा मूर्तिजापुरात जागर! स्मारकासाठी दातृत्वाचा ओघ; १० दिवसांच्या स्वच्छता आणि भक्ती उत्सवाची महाप्रसादाने सांगताप्रशासकीय काळातील उधळपट्टीनंतर नव्या अध्यक्षांसमोर आव्हानांचा डोंगर; बारणे घराण्याचा राजकीय वारसा की जगताप गटाचे वर्चस्व? पिंपरी-चिंचवडच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कोणाचा ‘राज्याभिषेक’ होणार?स्वराज्याच्या रक्षकाचा सांगवीत जागर! ज्येष्ठ समाजसेवक महेशशेठ भागवत यांच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव’ सोहळ्याचे शानदार आयोजन“कॅन्सरच्या चौथ्या स्टेजलाही नमवले!” तळेगावच्या डॉक्टरांनी वाचवले ६३ वर्षीय रुग्णाचे स्वरयंत्र; आधुनिक हेलिकल टोमोथेरपीचा यशस्वी प्रयोगशिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि सुशासन आजही प्रेरणादायी! व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधन; महापालिकेच्या ‘विचार प्रबोधन पर्वा’ला मिळतोय उदंड प्रतिसाद
Home अकोला निष्काम कर्मयोग्याचा मूर्तिजापुरात जागर! स्मारकासाठी दातृत्वाचा ओघ; १० दिवसांच्या स्वच्छता आणि भक्ती उत्सवाची महाप्रसादाने सांगता

निष्काम कर्मयोग्याचा मूर्तिजापुरात जागर! स्मारकासाठी दातृत्वाचा ओघ; १० दिवसांच्या स्वच्छता आणि भक्ती उत्सवाची महाप्रसादाने सांगता

३३ वर्षांची परंपरा आणि १५० व्या जयंतीचे औचित्य; ५ एकर जमीन दान देणारे श्रीधरभाऊ नाईक यांचा गौरव, भव्य शोभायात्रेने अवघे शहर झाले 'गाडगेबाबा'मय. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘गोपाला गोपाला’च्या गजराने दुमदुमली मूर्तिजापूर नगरी! संत गाडगेबाबांच्या जयंतीचे १५० वे वर्ष उत्साहात; नगराध्यक्ष हर्षल साबळे यांचा विशेष सत्कार

 


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तिजापूर : निष्काम कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मूर्तिजापूर नगरीत, गेल्या ३३ वर्षांची परंपरा जपत संत गाडगे महाराज स्मारक समितीच्या वतीने यंदाचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा गाडगेबाबांच्या जयंतीचे १५० वे वर्ष असल्याने शहरवासीयांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

संतश्रेष्ठ गाडगेबाबांचा जन्म महाशिवरात्रीचा असल्याने गेल्या १० दिवसांपासून शहरात स्वच्छता अभियान, भजन, कीर्तन आणि विविध सामाजिक उपक्रमांची धामधूम सुरू होती. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला संत गाडगेबाबा झोपडी परिसर (गौरक्षण) येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वीर भगतसिंग चौक मार्गे निघालेली ही शोभायात्रा गाडगेबाबा नगरातील स्मारकापाशी विसर्जित झाली. राजमाता जिजाऊ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि काला कीर्तनाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला होता.

या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्मारक समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.गाडगेबाबांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभारणीसाठी ५ एकर शेतजमीन दान करणारे आणि स्मारकाचे काम पूर्ण होईपर्यंत ५ वर्षांसाठी दरवर्षी ११ लाख रुपये देण्याचे जाहीर करणारे दर्यापूरचे श्रीधरभाऊ नाईक यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या या दातृत्वामुळे स्मारक उभारणीला मोठी गती मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल तिडके होते. प्रमुख अतिथी म्हणून स्मारकाच्या नूतनीकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे कमलाकर गावंडे, शिवसेना नेते गजानन चौधरी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, बाळासाहेब मोखडकर आणि अविनाश यावले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अरविंद तायडे यांनी केले, सूत्रसंचालन सचिव अनिल डाहेलकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत चहाकर यांनी केले. या जन्मोत्सवासाठी गाडगेबाबा विचारप्रेमी, धोबी समाज बांधव आणि स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!