पुणेकरांसाठी मोठी संधी! १३,५०० रुपयांच्या आरोग्य तपासण्या आता मोफत; बाजीराव रस्त्यावर रविवारी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, २१ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी हे शिबिर पार पडणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सुमारे १३,५०० रुपये किमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.
हे शिबिर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत बाजीराव रस्त्यावरील लोखंडे तालीम चौकात, नुमवी शाळेसमोर संपन्न होईल. शिबिरात खालील महत्त्वाच्या तपासण्या केल्या जाणार आहेत:
-
रक्त तपासणी: साखर (BSL-R), रक्तगट, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील विविध घटक (HB, RBC, WBC, PLT).
-
दंत आरोग्य: दंत तपासणी, कीड काढणे, सिमेंट भरणे, स्केलिंग आणि पॉलिशिंग.
-
नेत्र तपासणी: ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी.
-
कर्करोग तपासणी: ४० ते ६० वयोगटातील महिलांसाठी विशेष ‘मॅमोग्राफी’ (स्तन कर्करोग तपासणी).
-
मोफत चष्मा वाटप: जवळच्या दृष्टीचा त्रास असलेल्या महिला व पुरुषांना चष्म्यांचे वाटप करण्यात येईल.
वाढत्या महागाईच्या काळात आरोग्यासाठी होणारा मोठा खर्च वाचवण्यासाठी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमासाठी सुमित कुंभार, ओमकार नवले आणि संजय गायकवाड विशेष परिश्रम घेत आहेत.
-
स्थळ: नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक, पुणे.
-
वेळ: सकाळी १०:०० ते सायं ६:०० (रविवार, २२ फेब्रुवारी २०२६).
-
संपर्क: सुमित कुंभार (९५२९२३९६२८) / ओमकार नवले (८३०८७६०९८५).
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
