news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पुणे “१३,५०० रुपयांच्या तपासण्या पूर्णपणे मोफत!” बाजीराव रोडवरील महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“१३,५०० रुपयांच्या तपासण्या पूर्णपणे मोफत!” बाजीराव रोडवरील महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट आणि रामनवमी उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम; रिक्षाचालकांपासून महिलांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य कवच, मोफत चष्मे वाटपाने गरजूंच्या आयुष्यात प्रकाश. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्यात बाजीराव रोडवर ‘आरोग्य कुंभ’! रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या शिबिरात १२०० नागरिकांची मोफत तपासणी; कर्करोग चाचणीसह चष्म्यांचेही वाटप


पिंपरी/पुणे प्रतिनिधी आकाश कांबळे, २३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे : रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरास पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी बाजीराव रोडवरील लोखंडे तालीम चौक येथे पार पडलेल्या या शिबिरात सुमारे १२०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

हे शिबिर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बाजीराव रोडवर नागरिकांची तपासणीसाठी मोठी गर्दी दिसून आली. यामध्ये रिक्षाचालक, नोकरदार, महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग होता.

सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत अशा महागड्या तपासण्या या शिबिरात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

  • रक्त तपासणी: रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन (HB) आणि प्लेटलेट्सची तपासणी.

  • दंत आरोग्य: दात स्वच्छ करणे (Scaling), पॉलिशिंग आणि सिमेंट भरण्याची सुविधा.

  • विशेष तपासणी: ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू-काचबिंदू तपासणी आणि महिलांसाठी ‘मॅमोग्राफी’ (स्तन कर्करोग तपासणी).

  • चष्मा वाटप: गरजू महिला व पुरुषांना जवळच्या दृष्टीसाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दिनेश डोंगरे, ओंकार बगाडे, अमित सातव, साक्षी मुंढे, धनश्री पांगारे, किर्ती वर्मा, सोहन बंडीवडार, मानस लबडे, गौरव कुंभार, ओमकार नवले, आयुष लांडगे, गोविंद भोसले, सुमित कुंभार आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सुमारे १३,५०० रुपयांच्या आरोग्य सेवा मोफत मिळाल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!