news
दिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासनपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली मर्सिडीज कंपनीत उद्योजक व पोलीस विभागाचे भव्य समन्वय चर्चासत्रकृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाईपत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडकरांनो सज्ज व्हा! ‘पवनाथडी’ जत्रेचा उद्या सकाळी १० वाजता थाटात शुभारंभ

पिंपरी-चिंचवडकरांनो सज्ज व्हा! ‘पवनाथडी’ जत्रेचा उद्या सकाळी १० वाजता थाटात शुभारंभ

पी.डब्ल्यू.डी. मैदानावर ६०० हून अधिक स्टॉल्स; दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी, 'होम मिनिस्टर' आणि 'मराठी बाणा' कार्यक्रमांचे विशेष आकर्षण. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सांगवीत उद्यापासून रंगणार ‘पवनाथडी’ची धूम! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली आणि महिला बचत गटांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देणारी भव्य ‘पवनाथडी जत्रा’ उद्यापासून (२५ फेब्रुवारी) सांगवीत सुरू होत आहे. सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर आयोजित या जत्रेचे उद्घाटन उद्या सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न होणार आहे.

१ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या जत्रेत पिंपरी-चिंचवडकरांना खरेदीसह अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी मिळणार आहे.

या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे.

  • विशेष उपस्थिती: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार.

  • प्रमुख पाहुणे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अणा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ.

  • खासदार व आमदार: मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर यांचीही उपस्थिती असेल.

प्रशासनाच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर उपस्थित राहणार आहेत.

यावर्षी पवनाथडी जत्रेत महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, गृहपयोगी साधने आणि चविष्ट खाद्यपदार्थांचे शेकडो स्टॉल्स लावले आहेत. तसेच, दररोज सायंकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • २५ फेब्रुवारी: ‘महाराष्ट्राची मराठी बाणा’ (उद्घाटनपर विशेष कार्यक्रम)

  • २६ फेब्रुवारी: सुप्रसिद्ध ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम

  • २७ फेब्रुवारी: ऑर्केस्ट्रा म्युझिकल स्टार्स

  • २८ फेब्रुवारी: ‘फोक संस्कृती’

  • १ मार्च: ‘द फोक लावणी’ (जत्रेचा समारोप)

“पवनाथडी जत्रा हे केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या जत्रेला भेट देऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे,” असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि संपूर्ण महापालिका प्रशासन परिश्रम घेत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!