news
दिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासनपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली मर्सिडीज कंपनीत उद्योजक व पोलीस विभागाचे भव्य समन्वय चर्चासत्रकृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाईपत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘विचार प्रबोधन पर्व’! महापौरांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारीला नियोजन बैठक

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘विचार प्रबोधन पर्व’! महापौरांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारीला नियोजन बैठक

क्रांतीसूर्य आणि महामानवांच्या विचारांचा जागर होणार अधिक प्रभावी; नियोजनासाठी महापालिकेत विशेष बैठक, सामाजिक संघटनांना सूचना मांडण्याचे आवाहन. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘विचार प्रबोधन पर्व’; नियोजनासाठी २६ फेब्रुवारीला महापौरांच्या उपस्थितीत बैठक


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘विचार प्रबोधन पर्व’ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. या भव्य उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि विविध सामाजिक संघटनांशी विचारविनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात संपन्न होणार आहे.

महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जयंती उत्सवाचे स्वरूप, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची आखणी केली जाणार आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित राहून नियोजनाचा आढावा घेणार आहेत.

शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना मांडव्या, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे ‘विचार प्रबोधन पर्व’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!