news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड शैक्षणिक साहित्याने महापौरांचा गौरव; सत्कारासाठी शालोपयोगी वस्तू स्वीकारून रवी लांडगे यांनी ठेवला नवा आदर्श

शैक्षणिक साहित्याने महापौरांचा गौरव; सत्कारासाठी शालोपयोगी वस्तू स्वीकारून रवी लांडगे यांनी ठेवला नवा आदर्श

हार-तुऱ्याला फाटा देऊन महापौरांनी जोपासली सामाजिक बांधिलकी; नवनिर्वाचित नगरसेविका अरुणाताई लंगोटे यांचाही 'दिशा सोशल फाउंडेशन'तर्फे गौरव. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुस्तके आणि वह्या देऊन महापौरांचा अनोखा सत्कार! दिशा फाउंडेशनकडून रवी लांडगे आणि अरुणा लंगोटे यांचा सन्मान


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे आणि प्रभाग क्रमांक १४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका अरुणाताई लंगोटे यांचा ‘दिशा सोशल फाउंडेशन’च्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी बुके किंवा हार न घेता शालोपयोगी वस्तू स्वीकारून महापौरांनी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

सत्कारासाठी हार-तुऱ्यांवर खर्च न करता पुस्तके व वह्यांचे संच द्यावेत, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, दिशा सोशल फाउंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आणि संचालक ॲड. अविनाश ववले यांच्या हस्ते वह्या व शालोपयोगी वस्तू देऊन महापौरांचा गौरव करण्यात आला. यावेळी युवा उद्योजक शिवराज काटे यांचादेखील सन्मान कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, संचालक गणेश लंगोटे, राजेश सावंत आणि शरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

फाउंडेशनचे संचालक गणेश लंगोटे यांच्या पत्नी अरुणाताई लंगोटे यांची नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल मोहननगर येथील संपर्क कार्यालयात त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. गणेश लंगोटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि हजारो गरजूंना दिलेल्या मदतीची ही फलनिष्पत्ती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या घरगुती सोहळ्याला बाळासाहेब जवळकर, राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, कोषाध्यक्ष नंदकुमार कांबळे, अतुल शिंदे यांच्यासह फाउंडेशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना अरुणा लंगोटे यांनी मतदारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!