news
Home अकोला शिवरायांचे संघटन कौशल्य आणि नीतिमत्ता आजच्या काळाची गरज! जांभा खुर्द येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

शिवरायांचे संघटन कौशल्य आणि नीतिमत्ता आजच्या काळाची गरज! जांभा खुर्द येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे गाव शिवमय; तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील मोरे यांच्या हस्ते पूजन, तरुणांनी घेतला शिवविचारांचा वारसा जपण्याचा निर्धार. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जांभा खुर्दमध्ये शिवजयंतीचा उत्साह! गणराज मित्र मंडळाचा पुढाकार; छत्रपतींच्या विचारांचा जागर अन् शिवप्रतिमेचे पूजन


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे. ०१ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

जांभा खुर्द : ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात आणि अत्यंत हर्षोल्हासात ग्राम जांभा खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. गणराज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला असून, तरुणांनी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचा निर्धार केला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील मोरे यांनी भूषवले. तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य रणजित बावणेर, गजानन मोरे, सुधाकर मोरे, निलेश मोहड आणि गणराज मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव वानखडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष संतोष पाटील मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी महाराजांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या युद्धनीतीपासून ते त्यांच्या रयतेच्या राज्यापर्यंतच्या महान प्रवासावर प्रकाश टाकला. आजच्या युगात महाराजांचे संघटन कौशल्य आणि नीतिमत्ता जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

या सोहळ्याला जांभा खुर्द गावातील नागरिक आणि गणराज मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मुकेश घोटकर, राजू भाऊ लंगोटे, सचिन काळे, गोपाल पेटकर, मनीष मोरे, शेषराव पेठकर, किशोर मोरे, गजू मोरे, नंदू पेटकर, रवी पेठकर, संचित मोहोड, कृष्णा पेठकर, शिव मोरे, प्रतीक चक्रे, संगम मोहोड, दादू मोहोड, लकी पेटकर, सर्वदन लंगोटे, सार्थक पेटकर, आयुष पेटकर यांसह मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!