news
सीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ चे ऑनलाइन उद्घाटन२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यतानागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमकपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे ‘सिटी प्राईड SCHOOL’च्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; उपकरणांची माहिती व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीकर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
Home पिंपरी चिंचवड प्रामाणिक ग्राहकांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांवर अ‍ॅक्शन! २ एचपीचे पंप लावून खेचले जात होते पाणी; पाइपलाइनमधील ‘व्हॅक्युम’मुळे अस्वच्छ पाण्याचाही वाढला होता धोका

प्रामाणिक ग्राहकांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांवर अ‍ॅक्शन! २ एचपीचे पंप लावून खेचले जात होते पाणी; पाइपलाइनमधील ‘व्हॅक्युम’मुळे अस्वच्छ पाण्याचाही वाढला होता धोका

कनिष्ठ अभियंता प्रियांका शिंदे यांच्या पथकाची धडक कारवाई; शहरात सर्वच प्रभागांत अचानक धाडी टाकण्याचे प्रशासनाचे संकेत, पाणी चोरी केल्यास नळ जोडणी कापणार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे निलखमध्ये महापालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! नळाला थेट पंप लावणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई; १२ अनधिकृत विद्युत पंप जप्त


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०१ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपातीचे संकट असताना दुसरीकडे काही सोसायट्यांकडून नळाला थेट विद्युत पंप लावून पाणी खेचण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ‘ड’ प्रभागातील पिंपळे निलख परिसरात धडक कारवाई करत तब्बल १२ अनधिकृत विद्युत पंप जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील सामान्य नागरिकांना आता समप्रमाणात आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

पिंपळे निलख परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. महापालिकेच्या पथकाने अचानक केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. काही मोठ्या सोसायट्यांनी मुख्य नळ कनेक्शनला थेट दोन एचपी (HP) क्षमतेचे विद्युत पंप जोडून पाणी खेचले जात असल्याचे आढळले. अशा प्रकारे पाणी खेचल्यामुळे शेजारील इतर नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले होते, तसेच पाइपलाइनमध्ये व्हॅक्युम तयार होऊन अस्वच्छ पाणी नळात येण्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या.

पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेला कार्यकारी अभियंता महेश बरीदे आणि उप अभियंता प्रवीण धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. जप्त केलेले सर्व पंप महापालिकेच्या ताब्यात असून, संबंधित सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

“नागरिकांना समान आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. अनधिकृत पंपांमुळे जलवाहिन्यांवर ताण येतो आणि प्रामाणिक ग्राहकांचे नुकसान होते. ही मोहीम केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नसून, आगामी काळात सर्वच प्रभागांमध्ये अशा प्रकारे अचानक धाडी टाकून कठोर कारवाई केली जाईल.”

पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, नळाला थेट पंप लावणे बेकायदेशीर असून, यामुळे दंड आणि नळ कनेक्शन कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकार्य करावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!