news
भारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी
Home पिंपरी चिंचवड शांततेसाठी कामगार नगरीतून घुमला आवाज! पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून कौतुक; इराण-इस्रायल वादावर जागतिक नेतृत्वाने लक्ष देण्याचे आवाहन

शांततेसाठी कामगार नगरीतून घुमला आवाज! पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून कौतुक; इराण-इस्रायल वादावर जागतिक नेतृत्वाने लक्ष देण्याचे आवाहन

युद्धविराम आणि आर्थिक स्थैर्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा पुढाकार; शेकडो कामगारांच्या उपस्थितीत शांतता रॅली संपन्न, केंद्र आणि राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“युद्ध नको, शांतता हवी!” पिंपरीत कामगारांचा जागतिक शांततेसाठी एल्गार; यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिली भव्य रॅली


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : आखाती देशांमधील चिघळलेले युद्ध थांबवून जगात शांतता प्रस्थापित व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष आणि प्रख्यात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत “जागतिक शांतता” आव्हान रॅली काढण्यात आली. “युद्धामुळे केवळ प्राणहानी होत नाही, तर जगावर आर्थिक संकट ओढवते,” असा इशारा देत श्रमिकांनी पिंपरीच्या रस्त्यांवरून जागतिक शांततेचा संदेश दिला.

संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहार आणि श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन सर्व धर्मीय प्रार्थना करण्यात आली. रॅलीची सांगता संत तुकाराम महाराज हॉल येथे राष्ट्रगीताने करण्यात आली.

रॅलीला संबोधित करताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, “इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक अडकले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी परराष्ट्र धोरणामुळे इराणसह इतर देशांनी युद्ध थांबवून भारतीयांना सुखरूप मायदेशी परतू दिले. जगात युद्ध सुरू असतानाही भारत आज स्थिर आहे, याचे श्रेय केंद्र सरकारला जाते.”

रॅलीचे मुख्य उद्देश आणि मागणी:

  • युद्धविराम: आखाती देशातील युद्ध तात्काळ थांबवून निष्पाप नागरिकांचे बळी वाचवावेत.

  • आर्थिक स्थैर्य: युद्धामुळे जीवनावश्यक वस्तू महाग होऊन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू नये.

  • जागतिक नेतृत्व: शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा.

या रॅलीच्या यशस्वी आयोजनात भाजपचे शहर पदाधिकारी मंगेश धाडगे, मुन्ना बाविस्कर, दिनेश पाटील, दिपक पाटील, नंदू कदम, अमोल घोरपडे, शंकरराव शितोळे, ओंकार जोखारे, राहुल शितोळे, लता पाटील, अंकुश वाघमारे, स्वानंद राजपाठक, ईश्वर गायकवाड, शंकरराव गावडे आणि सतीश एरंडे यांनी पुढाकार घेतला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठरावही मंजूर करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड या कामगार नगरीतून निघालेली ही रॅली जगासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!