news
रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्तपुर्णा नगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुल
Home पुणे दिनदर्शिकेत महापुरुषांचा विसर की षडयंत्र? अण्णा भाऊ साठे अन् लहूजी वस्ताद यांच्या अवमानाने समाजबांधव संतप्त; सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा

दिनदर्शिकेत महापुरुषांचा विसर की षडयंत्र? अण्णा भाऊ साठे अन् लहूजी वस्ताद यांच्या अवमानाने समाजबांधव संतप्त; सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा

दिनदर्शिकेवरून पेटला वादाचा जाळ! महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचा उल्लेख टाळल्याने 'आर्टी' प्रशासन रडारवर; शिवशाही व्यापारी संघ अन् मातंग समाज आक्रमक. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


‘आर्टी’च्या अधिकाऱ्यांना निलंबित करा! अण्णा भाऊ साठे, लहूजी वस्ताद यांचा इतिहास पुसण्याचे षडयंत्र; सकल मातंग समाजाचा संताप


पिंपरी/पुणे प्रतिनिधी: बालाजी नवले, १० मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी/पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई यांच्या २०२६ च्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचा उल्लेख न केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे सकल मातंग समाज आणि शिवशाही व्यापारी संघ आक्रमक झाला असून, ‘आर्टी’चे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील भालेराव आणि निबंधक इंदिरा आस्वर यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या नेतृत्वाखाली हवेली तहसीलदार देशमुख यांच्यामार्फत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन सादर करण्यात आले.

आर्टी संस्थेच्या २०२६ च्या अधिकृत दिनदर्शिकेमध्ये:

  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजीची जयंती आणि १८ जुलै रोजीची पुण्यतिथी.

  • आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती व पुण्यतिथी.

    या महत्त्वाच्या दिवसांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. “हा केवळ विसर नसून मातंग समाजाच्या दैवतांचा इतिहास पुसण्याचे एक मोठे षडयंत्र आहे,” अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. जोपर्यंत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सकल मातंग समाजाचे समन्वयक डी. पी. खंडाळे, मारुती जाधव, शिवाजीराव खडसे, उपनेत्या उषामाई कांबळे, संगीता नानेकर, रंजना चन्ने, नामदेव खवळे, काशिनाथ हतागळे, नामदेव रिट्टे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!