news
Home पिंपरी चिंचवड १२ विविध तांत्रिक विभागांत ५५९ जागांची जंबो भरती! १० वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले; १० मार्च रोजी प्रस्तावाला मिळाली अधिकृत मंजुरी

१२ विविध तांत्रिक विभागांत ५५९ जागांची जंबो भरती! १० वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले; १० मार्च रोजी प्रस्तावाला मिळाली अधिकृत मंजुरी

पुणे-पिंपरी चिंचवडच्या तरुणांना रोजगाराची मोठी संधी! पीएमपीएमएलमध्ये २०२६-२७ वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची भरती; मोटर मेकॅनिक आणि ऑटो इलेक्ट्रिशियनच्या सर्वाधिक जागा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


ITI पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! PMPML मध्ये ५५९ शिकाऊ उमेदवारांची भरती; ‘या’ १२ ट्रेडसाठी अर्ज मागवले


पुणे/पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १२ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.’ (PMPML) मध्ये सन २०२६-२७ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची (Apprenticeship) मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी १० मार्च रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, तब्बल ५५९ जागांसाठी ही भरती होणार आहे.

शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुकीसाठी PMPML प्रशासनाने घोले रोड येथील ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला’ (ITI) पत्र पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

एकूण १२ विविध ट्रेडसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहन दुरुस्ती आणि तांत्रिक विभागातील कामांचा समावेश आहे:

अ.क्र. ट्रेडचे नाव उमेदवारांची संख्या अ.क्र. ट्रेडचे नाव उमेदवारांची संख्या
मोटर मेकॅनिक (MV) १२८ फिटर ६४
ऑटो इलेक्ट्रिशियन ९६ वेल्डर ६४
डिझेल मेकॅनिक ५६ शीट मेटल वर्कर ४२
टर्नर १६ १० मशिनिस्ट १५
प्लंबर ०९ ११ पेन्टर १३
सुतार (Carpenter) ०८ १२ वायरमन ०८

एकूण पदे: ५५९

इच्छुक उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे:

१. रीतसर अर्ज आणि दोन पासपोर्ट साईज फोटो.

२. ITI मार्कलिस्ट आणि १० वी उत्तीर्ण मार्कलिस्ट (झेरॉक्स).

३. आधार कार्ड (झेरॉक्स).

४. १००% ऑनलाईन प्रोफाईल पूर्ण असल्याची प्रिंटआउट.

५. MBBS डॉक्टरांचे शारीरिक फिटनेस सर्टिफिकेट.

पीएमपीएमएलचे ‘प्रभारी कामगार व जनसंपर्क अधिकारी’ यांनी ही माहिती दिली आहे. या शिकाऊ उमेदवारीमुळे आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून, परिवहन महामंडळाच्या तांत्रिक विभागालाही मनुष्यबळाची मदत होणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!