news
Home पिंपरी चिंचवड क्रांतिज्योतींच्या कार्याचा सांगवीत जागर! नारायणराव भागवत अन् अशोकराव भोसले यांच्याकडून सावित्रीबाईंच्या प्रेरक इतिहासावर प्रकाश; सांगवी विकास मंचचा स्तुत्य पुढाकार

क्रांतिज्योतींच्या कार्याचा सांगवीत जागर! नारायणराव भागवत अन् अशोकराव भोसले यांच्याकडून सावित्रीबाईंच्या प्रेरक इतिहासावर प्रकाश; सांगवी विकास मंचचा स्तुत्य पुढाकार

"स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंचा संघर्ष हाच आधुनिक भारताचा इतिहास!" ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांचे प्रतिपादन; सांगवीत व्याख्यानाद्वारे जागवल्या स्मृती. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


सांगवीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन! सांगवी विकास मंचच्या वतीने पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी : “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे जीवन आणि संघर्ष हा आधुनिक भारताचा इतिहास आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांनी केले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगवी येथे ‘सांगवी विकास मंच’ च्या वतीने १० मार्च रोजी विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह.भ.प. वाघ महाराज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भागवत आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव भोसले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना नारायणराव भागवत आणि अशोकराव भोसले यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा अत्यंत प्रभावी इतिहास उपस्थितांसमोर मांडला. महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी सोसलेले कष्ट आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत यांच्या नियोजनातून पार पडलेल्या या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, यामध्ये प्रामुख्याने: ज्येष्ठ कार्यकर्ते भरतशेठ कुंभार, ज्येष्ठ साहित्यिक मुरलीधर पंत दळवी, सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नेते दिलीप फाकटकर, कुंभार समाज प्रदेश कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब कुंभार, श्री. व सौ. खोल्लमताई, वाईकर तसेच सांगवीतील अनेक नागरिक.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महेशशेठ भागवत यांनी चोखपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी कृष्णकांत गिरगुणे काका यांनी उपस्थितांचे आभार मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!