news
केंद्र सरकारची कायमस्वरूपी नोकरी! NFSU च्या १२ कॅम्पसमध्ये नियुक्तीची संधी; पदवीधरांसाठी प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी“प्रशासकीय दिरंगाई खपवून घेणार नाही!” महापौर रवी लांडगे यांचा पुनावळेत पाहणी दौरा; एनएचएआय (NHAI) आणि महापालिका मिळून काढणार कायमस्वरूपी तोडगाभारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर! ‘राष्ट्रीय लोकअदालतीत’ अकोला पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी; १५ दिवसांच्या पूर्वतयारीला लाभले मोठे यश“अकोला पोलिसांचा गुन्हेगारांना सज्जड दम!” कुख्यात टोळीकडून गावठी बनावटीची पिस्टल अन् जिवंत काडतूस जप्त; ‘XUV ५००’ सह १० लाख ५९ हजारांचा मुद्देमाल ताब्यात“साहेब नव्हे, मी जनतेचा सेवक!” धारणी तहसीलदारांचा साधेपणा चर्चेत; पोलीस ठाण्यापासून कृषी विभागापर्यंत चिमुकल्यांची ‘सफारी’
Home अकोला “अकोल्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही!” पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा कडक इशारा; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत गुन्हेगारांना वर्षभरासाठी ‘स्थानबद्ध’ करण्याचे आदेश

“अकोल्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही!” पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा कडक इशारा; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत गुन्हेगारांना वर्षभरासाठी ‘स्थानबद्ध’ करण्याचे आदेश

शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले! कुख्यात करीम खान आणि शेख कासम यांची रवानगी थेट जिल्हा कारागृहात; जानेवारीपासून आतापर्यंत ७ धोकादायक गुंडांवर 'एमपीडीए'चा बडगा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


अकोला पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! दोन कुख्यात गुंड ‘एमपीडीए’खाली वर्षभरासाठी स्थानबद्ध; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १४ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला : अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. शहरातील विविध गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या दोन कुख्यात गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, त्यांना एका वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील तब्बल ७ धोकादायक व्यक्तींना या कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे.

१. करीम खान उर्फ बबलू अन्वर खान (वय २९, रा. झिराबावडी, सिंधी कॅम्प, खदान): याच्यावर इच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, गृह-अतिक्रमण, अंमली पदार्थ (गांजा) विक्री आणि अश्लील कृत्ये असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

२. शेख कासम उर्फ गुड्या शेख कबीर (वय २९, रा. गाडगे नगर, जुने शहर): याच्यावर विनयभंग, लैंगिक सतावणूक, घरात चोरी, घातक शस्त्रांनी हल्ला आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंद आहेत.

दोन्ही आरोपींना यापूर्वी वारंवार प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता.

अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी कायदेशीर पडताळणी केली. हे दोन्ही गुन्हेगार समाजासाठी धोकादायक असल्याची खात्री पटल्यानंतर, त्यांना १३ मार्च २०२६ रोजी एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. आदेश मिळताच खदान आणि जुने शहर पोलिसांनी या दोन्ही गुंडांना तात्काळ ताब्यात घेऊन कारागृहात रवाना केले.

आगामी गुढीपाडवा, रमजान ईद आणि श्रीराम नवमी या सणांच्या काळात शहरात शांतता राहावी, यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. “अशाच प्रकारे गुन्हे करणाऱ्या आणि कायद्याला न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आगामी काळात एमपीडीए व इतर कडक कायद्यांनुसार कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, खदान पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि जुने शहर पोलीस निरीक्षक नितीन लेहरकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!