news
पुण्याहून मुंबईकडे जाताना फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक; कारमधील एक जण गंभीर जखमी, तर तिघे सुदैवाने बचावलेसुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधी
Home मुख्यपृष्ठ मुंबई-सातारा लेनवर मेट्रोचा मेगाब्लॉक! बालेवाडी परिसरात महामार्गाचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद; पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांची महत्त्वाची अधिसूचना

मुंबई-सातारा लेनवर मेट्रोचा मेगाब्लॉक! बालेवाडी परिसरात महामार्गाचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद; पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांची महत्त्वाची अधिसूचना

बालेवाडी मेट्रो स्टेशनच्या 'फूट ओव्हर ब्रिज'चे काम युद्धपातळीवर! मुख्य महामार्गावरील वाहतूक 'सर्व्हिस रोड'ने वळवली; शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत महामार्ग बंद. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


वाहनचालकांनो लक्ष द्या! बालेवाडीत मेट्रोच्या कामासाठी मुंबई-बेंगलोर महामार्ग राहणार बंद; जाणून घ्या वाहतुकीचे नवीन बदल


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १४ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : मुंबई-बेंगलोर महामार्गावर बालेवाडी मेट्रो स्टेशन क्र. १० येथे फुट ओव्हर ब्रिजच्या (FOB) उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

बालेवाडी मेट्रो स्टेशनच्या कामासाठी मुंबई लेन आणि सातारा लेन अशा दोन्ही बाजूंचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.

  • मनाई असलेला मार्ग: मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारा आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा मुख्य महामार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

  • पर्यायी मार्ग: मुख्य महामार्गावरील सर्व वाहतूक महामार्गाला लागून असलेल्या ‘सर्व्हिस रोड’ने (सेवा रस्ता) वळवण्यात आली आहे. वाहनचालक सेवा रस्त्याचा वापर करून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात.

सदर वाहतूक बदल मर्यादित कालावधीसाठी लागू असतील:

  • सुरुवात: दिनांक १४ मार्च २०२६ रोजी रात्री २३:०० वाजता (११:०० PM).

  • समाप्ती: दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ०५:०० वाजेपर्यंत (५:०० AM).

हे काम मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडमार्फत करण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना स्पष्ट दिसेल असे माहिती फलक लावण्याच्या आणि बॅरिगेटिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी टाटा प्रोजेक्ट्सकडून ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे.

बावधन वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून सर्व सुरक्षा उपाययोजना करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि नियोजित वेळेत प्रवास करताना सेवा रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!