news
“अकोला पोलिसांचा गुन्हेगारांना सज्जड दम!” कुख्यात टोळीकडून गावठी बनावटीची पिस्टल अन् जिवंत काडतूस जप्त; ‘XUV ५००’ सह १० लाख ५९ हजारांचा मुद्देमाल ताब्यात“साहेब नव्हे, मी जनतेचा सेवक!” धारणी तहसीलदारांचा साधेपणा चर्चेत; पोलीस ठाण्यापासून कृषी विभागापर्यंत चिमुकल्यांची ‘सफारी’“फसवणूक झाली तर घाबरू नका, थेट पोलिसांशी संपर्क साधा!” सायबर तज्ज्ञ डॉ. रोहन न्यायाधीश यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला; अनावश्यक अ‍ॅप्स अन् प्रलोभनांपासून दूर राहण्याची सूचना“नागरिकांची पायपीट थांबणार!” बापू काटे अन् प्रशांत शितोळे यांची उपसूचना महापौरांकडून मंजूर; अंतराच्या त्रासातून सुटका करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांचे जाळे विस्तारलेकिरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर! अकोल्याच्या ट्रक चालकाला एमआयडीसीमध्ये अमानुष मारहाण; कंपनी मालक संतोष खाडे पोलिसांच्या जाळ्यात
Home अकोला किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर! अकोल्याच्या ट्रक चालकाला एमआयडीसीमध्ये अमानुष मारहाण; कंपनी मालक संतोष खाडे पोलिसांच्या जाळ्यात

किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर! अकोल्याच्या ट्रक चालकाला एमआयडीसीमध्ये अमानुष मारहाण; कंपनी मालक संतोष खाडे पोलिसांच्या जाळ्यात

१०० किलो मालाच्या वजनावरून पेटला वाद! लोखंडी पाईपने ट्रक चालकावर हल्ला; 'एस के स्टील'च्या मालकासह मजुरावर 'बीएनएस' (BNS) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


माल कमी भरल्याच्या वादातून ट्रक चालकाला बेदम मारहाण; मूर्तिजापूर एमआयडीसीतील ‘एस के स्टील’ कंपनीच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तिजापूर (अकोला) : मालाचे वजन कमी भरल्याच्या किरकोळ वादातून एका ट्रक चालकाला लोखंडी पाईपने आणि थापडांनी बेदम मारहाण केल्याची घटना मूर्तिजापूर एमआयडीसीमधील ‘एस के स्टील’ कंपनीत घडली आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कंपनीचे मालक संतोष खाडे यांच्यासह एका मजुराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अकोला येथील रहिवासी असलेले ट्रक चालक जगजीतसिंग सुदन (वय ५०) हे रायपूर येथून माल घेऊन मूर्तिजापूर एमआयडीसीमधील ‘एस के स्टील’ कंपनीत आले होते. माल उतरवत असताना त्याचे वजन करण्यात आले, तेव्हा मालामध्ये १०० किलो वजन कमी भरल्याचे समोर आले. या कारणावरून कंपनीचे मालक संतोष खाडे यांनी जगजीतसिंग यांना “मी तुला ४० किलोचे पैसे कमी देणार” असे म्हटले.

या विषयावरून चालक आणि काट्यावाला यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.

फिर्यादीनुसार, आरोपी संतोष खाडे आणि तेथील एका मजुराने संगणमत करून जगजीतसिंग यांना शिवीगाळ करत लोटालोट केली. रागाच्या भरात आरोपींनी जवळच पडलेल्या लोखंडी पाईपने जगजीतसिंग यांच्या पाठीवर, हाताच्या बोटावर आणि डाव्या पंजावर प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच थापडबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

मारहाणीनंतर जगजीतसिंग सुदन यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

१. संतोष बाबाराव खाडे (वय ३५, रा. मूर्तिजापूर)

२. एक अनोळखी मजूर (वय अंदाजे ४० वर्ष)

या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा पोलीस हवालदार शैलेश मेश्राम यांनी दाखल करून घेतला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार इरफानौद्दीन करत आहेत. एमआयडीसी परिसरात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे कामगार आणि चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!