news
गॅस टंचाईच्या नावाखाली काळाबाजार करणाऱ्यांवर पीसीएमसी पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! तीन ठिकाणी कारवाई, मुद्देमाल जप्तमनोरंजन की सामाजिक शोकांतिका? खरात प्रकरणातील पीडितांच्या चारित्र्यहननावरून प्रफुल्ल श्रीधर यांनी समाजाला फटकारलेMAHATET २०२६ चा बिगुल वाजला! २१ जूनला राज्यभरात रंगणार परीक्षा; पात्रता धारकांनी २७ मार्चपासून भरावेत अर्जअमरावती विभागात ३,५४७ अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित! जिल्हा दक्षता समितीने दरमहा आढावा घेण्याच्या सूचनाअमरावतीच्या ३८ गुणवंतांना ‘TCS’ मध्ये नियुक्तीची पत्रे! ‘पंडित दीनदयाल उपाध्याय मेळाव्या’त तरुणांच्या स्वप्नांना मिळाली भरारी
Home अमरावती मनोरंजन की सामाजिक शोकांतिका? खरात प्रकरणातील पीडितांच्या चारित्र्यहननावरून प्रफुल्ल श्रीधर यांनी समाजाला फटकारले

मनोरंजन की सामाजिक शोकांतिका? खरात प्रकरणातील पीडितांच्या चारित्र्यहननावरून प्रफुल्ल श्रीधर यांनी समाजाला फटकारले

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने समाजमन सुन्न! अमरावती 'अंनिस'चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांचा परखड विचार; पीडित महिलांच्या मानसापमानापेक्षा सोशल मीडियावरील 'व्हायरल' स्पर्धा ठरतेय अधिक घातक. | @ २०२६ | मॅक्स मंथन विशेष संवाद

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


विशेष लेख: प्रकरण खरातचे; पण आरसा समाजाचा! पीडितांच्या वेदनेपेक्षा समाजमाध्यमांवरील ‘टवाळकी’ अधिक भयावह


नाशिक/अमरावती, २६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष संवाद:

नाशिक/अमरावती : नाशिकमधील तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याने महिलांचे केलेले लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवत आहे. मात्र, या प्रकरणाच्या निमित्ताने गुन्हेगाराच्या विकृतीपेक्षाही समाजाची आणि विशेषतः समाजमाध्यमांची (Social Media) बदललेली संवेदनशीलता अधिक चिंताजनक ठरत आहे. या गंभीर विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी समाजाला अंतर्मुख करणारा विचार मांडला आहे.

खरात प्रकरणात अनेक महिलांचा छळ आणि शोषण झाले आहे. या महिला सध्या कोणत्या मानसिक दडपणाखाली असतील, याचा विचार करण्याऐवजी समाजमाध्यमांवर काही विशिष्ट व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. चेहेरे स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने हे चित्रण प्रसारित करून त्यावर अश्लील आणि असंवेदनशील टिप्पण्या केल्या जात आहेत. हा विषय मनोरंजनाचा नसून अत्यंत गंभीर सामाजिक चिंतनाचा आहे, परंतु समाजाचा एक मोठा घटक याकडे केवळ ‘चघळण्याचा विषय’ म्हणून पाहत आहे.

लेखक प्रफुल्ल श्रीधर यांनी एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले आहे. एखादी पीडित महिला, जिने अजूनही कुटुंबाच्या सन्मानाखातर पुढे येण्याचे धाडस केलेले नाही, तिच्या मनात सध्या किती मोठे वादळ असेल? “माझाही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असेल का? उद्या तो व्हायरल झाला तर माझ्या सन्मानाचे काय?” अशा असंख्य प्रश्नांच्या ओझ्याखाली त्या स्त्रिया दबल्या गेल्या आहेत. समाजातील टवाळखोर वृत्ती अशा पीडितांना आत्महत्येसारख्या टोकाच्या पाऊलाकडे ढकलत नाहीये का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशा घटनांमध्ये समाज नेहमी पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. “ती तिथे गेलीच का?” किंवा “तिने विश्वास का ठेवला?” असे प्रश्न विचारून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. ही पुरुषप्रधान मानसिकता बदलल्याशिवाय अशा विकृत लोकांचे धाडस थांबणार नाही. समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे की, या महिला दोषी नसून त्या ‘पीडित’ आहेत. त्या फसवणुकीच्या, ब्लॅकमेलिंगच्या आणि दहशतीच्या बळी आहेत.

“हा प्रसंग समाजाला स्वतःच्या मानसिकतेचा आरसा दाखवणारा आहे,” असे मत प्रफुल्ल श्रीधर यांनी व्यक्त केले आहे. आज गरज आहे ती पीडितांकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणेने पाहण्याची. स्त्रीच्या सन्मानाला समाजजीवनाचा केंद्रबिंदू मानल्याशिवाय आपण एक सुदृढ समाज म्हणून उभे राहू शकणार नाही.


लेखक: प्रफुल्ल मंदा श्रीधर

(जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!