news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड वाकड पोलिसांचा ‘हायटेक’ चोराला दणका! मॅकबुक, आयफोनसह महागड्या दुचाकी हस्तगत; २४ तासांत आरोपी जेरबंद

वाकड पोलिसांचा ‘हायटेक’ चोराला दणका! मॅकबुक, आयफोनसह महागड्या दुचाकी हस्तगत; २४ तासांत आरोपी जेरबंद

मुंबई-पुण्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड! वाकड पोलीस तपास पथकाची कौशल्याने कामगिरी; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आदिल खानला ताथवड्यातून ठोकल्या बेड्या. २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त. | @ २०२६ | मॅक्स मंथन गुन्हेगारी विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला २४ तासांत बेड्या; मुंबई-पुण्यातील अनेक गुन्हे उघड


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन गुन्हेगारी विशेष:

पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईमुळे वाकडसह मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशांक महावरकर, आणि अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा (गु.र.नं. १४६/२०२६) तपास करत असताना, तपास पथकाने घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण केले. चोरीला गेलेल्या ‘ॲक्सेस’ दुचाकीवर एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ताथवडे येथील डेअरी फार्मसमोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपी: आदिल नुमान खान (वय २५ वर्षे, रा. नायगाव, मुंबई).

जप्त केलेला मुद्देमाल (किंमत अंदाजे २,६७,०००/- रुपये):
  • २ मोपेड दुचाकी

  • ३ महागडे मोबाईल फोन

  • मॅकबुक (MacBook) आणि एअरपॉड (AirPods)

  • डिजिटल गेमिंग प्लेस्टेशन, कंट्रोलर आणि अडॅप्टर

  • चार्जर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने वाकडसह मुंबई आणि सातारा भागातही गुन्हे केल्याची कबुली दिली. यामध्ये खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:

  1. वाकड पोलीस ठाणे: गु.र.नं. १४६/२०२६ आणि १४९/२०२६ (घरफोडी व चोरी)

  2. शिरवळ पोलीस ठाणे (सातारा): गु.र.नं. ००९५/२०२६

  3. जुहू पोलीस ठाणे (मुंबई): गु.र.नं. ०३४५/२०२६

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्रीनिवास दराडे, सपोनि अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक बिभीषण कण्हेरकर व त्यांच्या पथकाने (संदीप गवारी, वंदू गिरे, साबळे, झेंडे, खराडे, भगत, गायकवाड) केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!