news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home मुख्यपृष्ठ स्पा आणि मसाज पार्लरच्या आडून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाला पोलिसांचा दणका! २०२६ मध्ये आतापर्यंत १७ महिलांची सुटका

स्पा आणि मसाज पार्लरच्या आडून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाला पोलिसांचा दणका! २०२६ मध्ये आतापर्यंत १७ महिलांची सुटका

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा (AHTU) सम्राट चौकातील 'रिच फील स्पा'वर छापा! पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने अवैध व्यवसायाविरुद्ध मोठी मोहीम; स्पा मॅनेजरला अटक तर चालकावर गुन्हा दाखल. | @ २०२६ | मॅक्स मंथन गुन्हेगारी विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई! पिंपरीत ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; ३ महिलांची सुटका


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन गुन्हेगारी विशेष:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील हॉटेल, मसाज पार्लर आणि ‘स्पा’च्या नावाखाली चालणाऱ्या अवैध देहविक्री व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) पिंपरीतील ‘रिच फील स्पा’वर (Rich Feel Spa) छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी स्पा मॅनेजरला अटक केली असून मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी (दि. २५ मार्च) सायंकाळी ४:३० च्या सुमारास संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट चौक, पिंपरी येथे असलेल्या ‘रिच फील स्पा’वर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ पीडित महिलांची सुटका केली आहे.

आरोपींची माहिती:

१. अक्षय महादेव सुतार (वय २६, रा. निगडी; मूळ रा. कोडोली, कोल्हापूर) – अटक (स्पा मॅनेजर)

२. मयूर दिनेश मोहिते (वय २६, रा. दिघी) – (स्पा चालक)

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे:

  • एकूण छापे: ८ (६ मसाज पार्लर/स्पा आणि २ हॉटेल्स)

  • अटक आरोपी: २०

  • सुटका केलेल्या महिला: १७

पोलीस आयुक्तांनी गेल्या ३ वर्षात सार्वजनिक ठिकाणी अवैध देहविक्री करणाऱ्या २९ आस्थापनांना (हॉटेल्स/स्पा) १ वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सन २०२६ मध्ये आतापर्यंत ३ आस्थापनांवर ही कारवाई पूर्ण झाली असून, इतर अनेक संशयास्पद ठिकाणांची चौकशी सुरू आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे, सुनील शिरसाट, भगवंता मुठे, गणेश कारोते, श्रद्धा भरगुडे, वैष्णवी गावडे, नीलम बुचडे, संगीता जाधव आणि उदयकुमार भोसले यांच्या पथकाने केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!