news
Home पिंपरी चिंचवड ‘क्रेसेंडो २०२६’ मध्ये प्रवीण तरडे यांची फटकेबाजी; तंत्रज्ञान आणि बदलत्या जगाचा वेध घेण्याचा मंत्र

‘क्रेसेंडो २०२६’ मध्ये प्रवीण तरडे यांची फटकेबाजी; तंत्रज्ञान आणि बदलत्या जगाचा वेध घेण्याचा मंत्र

आयआयएमएस आणि आयबीएमआरच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सव यशस्वी; यशासाठी 'खरेपणा' आवश्यक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटचालीत खरेपणाचा ध्यास धरावा; प्रवीण तरडे यांचे ‘क्रेसेंडो २०२६’ मध्ये आवाहन

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ३१ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या प्रवासात केवळ सध्याच्या आव्हानांना सामोरे न जाता, भविष्यातील संभाव्य घटनांचा वेध घेऊन आपले व्यक्तिमत्व सज्ज ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण वाटचालीत खरेपणाचा ध्यास धरावा,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयबीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्रेसेंडो २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

क्रेसेंडो २०२६ या महोत्सवाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आयआयएमएस आणि आयबीएमआरच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी गायन, नृत्य आणि नाट्य सादरीकरणातून आपले कलागुण उत्कृष्टरीत्या सादर केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतची सर्व धुरा विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळली.

प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपल्या व्यक्तिमत्त्वात असलेला खरेपणाच आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातो. तंत्रज्ञान आणि बदलत्या जगाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला अपडेट ठेवणे ही काळाची गरज आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. या सोहळ्याला यशस्वी ग्रुपचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी, तसेच संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे ‘क्रेसेंडो २०२६’ हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!