news
मोशी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प दुर्घटना: काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे आयुक्तांना पत्र; ‘अँथोनी लारा’ कंपनीवर कारवाईची मागणीदापोडीत संतांच्या समता विचारांचा जागर! मुसळधार पावसात काँग्रेसकडून वारकऱ्यांना रेनकोटचे वाटपपिंपरी-चिंचवड मनपाचा ‘क्लीन वारी’ पॅटर्न यशस्वी! लाखांचा जनसमुदाय ओसरताच अवघ्या दोन तासांत शहर चकाचकपिंपरी-चिंचवड महापालिकेत जनक्षोभ! पूर ओसरल्यावरही वस्त्या गाळात, मदतीऐवजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बैठकांमध्येच ‘व्यस्त’पिंपरी-चिंचवड पालिकेत भाजपची ‘एकहाती’ सत्ता! सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचेच नगरसेवक बिनविरोध
Home पिंपरी चिंचवड रुपीनगर उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले महापालिका प्रशासन! उपमहापौरांशी साधला थेट संवाद

रुपीनगर उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले महापालिका प्रशासन! उपमहापौरांशी साधला थेट संवाद

औद्योगिक क्रांती ते आधुनिक नागरीकरण; विद्यार्थ्यांसोबत रंगला इतिहासाचा आणि प्रशासनाचा संवाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शहराच्या इतिहासाचे धडे; रुपीनगर उर्दू विद्यालयाची महापालिकेला भेट

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: २ एप्रिल २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शहराचा इतिहास आणि महापालिका प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती दिली. रुपीनगर येथील उर्दू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्थानिक इतिहास अभ्यासाच्या निमित्ताने उपमहापौरांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या भेटीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक क्रांतीपासून ते आधुनिक नागरीकरणापर्यंतचा प्रवास सोप्या भाषेत उलगडून दाखवला. “शहराने औद्योगिक विकास, स्थलांतरित लोकसंख्या आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधांच्या जोरावर कशा प्रकारे प्रगती साधली, हे समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

केवळ माहिती न घेता विद्यार्थ्यांनीही अत्यंत जिज्ञासूवृत्तीने उपमहापौरांना प्रश्न विचारले. शहरातील शिक्षण व्यवस्था, स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शर्मिला बाबर यांनी मनमोकळी उत्तरे दिली. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीची सफर घडवून आणली. त्यांनी करसंकलन, आरोग्य, बांधकाम परवाना, पाणीपुरवठा आणि स्वच्छता अशा विविध विभागांची रचना व त्यांची कार्यपद्धती समजावून सांगितली. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा अनुभव घेता आला.

या शैक्षणिक भेटीत शाळेच्या शिक्षक समितीचे अध्यक्ष अशफाक शेख, शिक्षक मोहम्मद आतिफ फैजल, शिक्षिका ताहेरा शेख यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अशा प्रकारच्या भेटींमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांना नागरी प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख होते,” असे मत शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!