news
मोशी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प दुर्घटना: काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे आयुक्तांना पत्र; ‘अँथोनी लारा’ कंपनीवर कारवाईची मागणीदापोडीत संतांच्या समता विचारांचा जागर! मुसळधार पावसात काँग्रेसकडून वारकऱ्यांना रेनकोटचे वाटपपिंपरी-चिंचवड मनपाचा ‘क्लीन वारी’ पॅटर्न यशस्वी! लाखांचा जनसमुदाय ओसरताच अवघ्या दोन तासांत शहर चकाचकपिंपरी-चिंचवड महापालिकेत जनक्षोभ! पूर ओसरल्यावरही वस्त्या गाळात, मदतीऐवजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बैठकांमध्येच ‘व्यस्त’पिंपरी-चिंचवड पालिकेत भाजपची ‘एकहाती’ सत्ता! सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपचेच नगरसेवक बिनविरोध
Home अकोला सिव्हिल लाईन पोलीस ठाणे बनले वादाचे केंद्र! विनयभंग आणि अवैध धंद्यांच्या तक्रारींमुळे पोलीस दल हादरले

सिव्हिल लाईन पोलीस ठाणे बनले वादाचे केंद्र! विनयभंग आणि अवैध धंद्यांच्या तक्रारींमुळे पोलीस दल हादरले

भरदिवसा शिक्षिकेची साखळी लांबवली; तीन दिवस उलटूनही आरोपींचा पत्ता नाही, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोल्यात खाकी डागाळली! सिव्हिल लाईन पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नाही, पण महिलांशी गैरवर्तन करण्यात आघाडीवर?

 

 

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला: अकोला शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे सध्या तीन-तेरा वाजले असून, सिव्हिल लाईन पोलीस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, तेच पोलीस कर्मचारी आता महिलांशी गैरवर्तन आणि विनयभंग करत असल्याच्या धक्कादायक तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे अकोल्यात ‘रक्षकच भक्षक’ बनल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

३१ मार्च २०२६ रोजी अकोल्यात एका शिक्षिकेची भररस्त्यात २.५ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवली. ही घटना घडली तेव्हा शहर गजबजलेले असतानाही चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे, या घटनेला तीन दिवस उलटूनही सिव्हिल लाईन पोलिसांना आरोपींचा साधा सुगावाही लागलेला नाही. पोलिसांच्या या ‘आळशी’ कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे.

केवळ गुन्हेगारी रोखण्यात अपयश आलेले नाही, तर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे महिलांशी असलेले वर्तन अत्यंत खालच्या पातळीचे असल्याचे बोलले जात आहे. महिलांच्या सन्मानाची ऐशीतैसे करत काही पोलीस चक्क विनयभंगासारखे गंभीर प्रकार करत असल्याच्या तक्रारींमुळे अकोला पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. या मुजोर कर्मचाऱ्यांवर ठाणेदारांचा कोणताही वचक उरलेला नाही, ही जिल्ह्यासाठी शरमेची बाब ठरत आहे.

परिसरात वरली-मटका आणि जुगार अड्ड्यांचा महापूर आला आहे. या अवैध धंद्यांतून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी साटेलोटे असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मटका अड्ड्यांवर नियंत्रण मिळवण्यात ठाणेदारांना सपशेल अपयश आले असून, कर्मचारी कर्तव्यापेक्षा अवैध धंद्यांचे रक्षण करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र दिसत आहे.

एकीकडे भरदिवसा होणारी लूटमार आणि दुसरीकडे खुद्द पोलिसांकडूनच महिलांचा होणारा विनयभंग, अशा दुहेरी संकटात अकोलेकर सापडले आहेत. शिस्तीचा अभाव असलेल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या या ‘बेफाम’ कारभारावर जिल्हा पोलीस अधीक्षक आता काय कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!