news
पिंपरी-चिंचवडमध्ये उप-वर्गीकरणाच्या मागणीसाठी हिंदू मातंग एकता सेना आणि शिवशाही शासन पक्षाचे शक्तीप्रदर्शनमोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी पिंपरी मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; दोन बड्या अभियंत्यांची तडकाफडकी हकालपट्टीपिंपरी-चिंचवड मनपाच्या १० प्रभाग समित्यांवर नव्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड; प्रजित नायर यांनी पाहिले पीठासीन अधिकारी म्हणून कामअमरावती अंनिसच्या शहर अध्यक्षपदी मिलिंद तायडे; पाक्षिक सभेत जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा निर्धार‘वर्ल्डस्किल्स’ जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवण्याची हुकमी संधी; ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ चा रणसंग्राम सुरू
Home पिंपरी चिंचवड मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी पिंपरी मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; दोन बड्या अभियंत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी पिंपरी मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; दोन बड्या अभियंत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

प्रमोद ओंबासे आणि सोहन निकम यांच्याकडे सोपवला अतिरिक्त कार्यभार; सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील अनधिकृत बांधकामाचे पडसाद; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह योगेश आल्हाट यांची उचलबांगडी! आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तडकाफडकी आदेश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्यंत गाजावाजात उद्घाटन झालेल्या मोशी येथील अत्याधुनिक ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील कथित अनधिकृत बांधकाम आणि निष्काळजीपणा अखेर पर्यावरण प्रकल्प अधिकारी तथा मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना चांगलाच भोवला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज एक मोठा प्रशासकीय निर्णय घेत संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडून त्यांचे पदभार काढून घेत त्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे.

१ ऑगस्ट २०२३ रोजी शिवाजीनगर (पुणे) येथून ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटीलदिलीप वळसे पाटील उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. मात्र, उद्घाटनानंतर या प्रकल्पाच्या दर्जावरून आणि प्रशासकीय दुर्लक्षावरून वाद निर्माण झाला होता.

पिंपरी-चिंचवड शहराच्या घनकचरा विघटनासाठी मोशी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित DBOT (डिझाईन, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर) तत्त्वावर हा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. केंद्र सरकारचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे मेट्रो आणि पीएमआरडीए (PMRDA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला.

परंतु, गेल्या काही वर्षांत अशा अनेक प्रकल्पांची दुरवस्था झाल्याचा आरोप होत असतानाच, मोशी प्रकल्पात एक गंभीर गैरप्रकार समोर आला. या प्रकल्पात केवळ ग्राउंड फ्लोअर (तळमजला) बांधण्याची अधिकृत परवानगी असतानाही, त्या ठिकाणी नियमबाह्य व अनधिकृतपणे दोन मजली इमारत उभारण्यात आली. मुख्य पर्यावरण प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना हा सर्व प्रकार माहिती असूनही त्यांनी यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे ते गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. अखेर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणी कठोर पाऊल उचलत त्यांची हकालपट्टी केली आहे.

महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने (आदेश क्र. साप्रवि/१/कावि/२८९/२०२६, दिनांक १३/०७/२०२६) जारी केलेल्या अधिकृत पत्रात, प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार सोपवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. यापूर्वीच्या २२/०८/२०२४ आणि १५/१२/२०२५ च्या आदेशांचा संदर्भ देऊन आज हा अंतिम निर्णय घेण्यात आला.

श्री. कुलकर्णी संजय नारायण (मुख्य अभियंता-१): यांच्याकडील संबंधित सर्व विभागांचा कामकाज व पदभार काढून तो श्री. ओंबासे प्रमोद सुधाकर (मुख्य अभियंता-२) यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला आहे. श्री. आल्हाट योगेश सोपान (कार्यकारी अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी): यांच्याकडील कार्यभार काढून तो श्री. निकम सोहन मधुकर (कार्यकारी अभियंता – पर्यावरण) यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आला आहे. नवनियुक्त अधिकारी श्री. प्रमोद ओंबासे आणि श्री. सोहन निकम यांनी त्यांना यापूर्वी सोपवलेले मूळ कामकाज सांभाळून या नवीन विभागांचा अतिरिक्त पदभार तात्काळ स्वीकारायचा आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आजच्या (१३ जुलै २०२६) दिनांकापासूनच करण्याचे कडक निर्देश दिले असून, या आदेशाच्या प्रती स्थापत्य विभाग, पर्यावरण विभाग आणि संबंधित विभागांना तात्काळ रवाना करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील भ्रष्टाचाराची आणि अनधिकृत बांधकामाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी थेट मुख्य अभियंत्यांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने महानगरपालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, यामुळे इतर कामचुकार व दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!