news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड ‘बुलडोझर टीपीसाठीच!’ कुदळवाडीत उसळला असंतोष; तीव्र आंदोलनाचा निर्धार!

‘बुलडोझर टीपीसाठीच!’ कुदळवाडीत उसळला असंतोष; तीव्र आंदोलनाचा निर्धार!

महापालिकेच्या भूमिकेमुळे ग्रामस्थ संतप्त; भूमिहीन होऊ देणार नसल्याचा निर्धार!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘बुलडोझर टीपीसाठीच होता!’ कुदळवाडी पेटली! ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा निर्धार!

चिखली ( मॅक्स मंथन डेली न्यूज ): तीन महिन्यांपूर्वी कुदळवाडीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात झालेली बुलडोझर कारवाई प्रत्यक्षात टीपी (Town Planning) योजनेसाठीच होती, हे महापालिकेने जाहीर केल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. या कारवाईमुळे कुदळवाडीतील ग्रामस्थांची प्रचंड बदनामी झाली, अनेकजण बेरोजगार झाले, उद्योगधंदे बंद पडले आणि कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. आता ही कारवाई टीपी योजनेसाठीच ‘रचली’ गेली, हे उघड झाल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आज (दि.०५) सकाळी कुदळवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टीपी स्किमला तीव्र विरोध करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. संतप्त ग्रामस्थांनी “आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण ही टीपी स्किम होऊ देणार नाही,” अशा कठोर शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ यावेळी टीपी स्किमच्या जाहिरातीची प्रत जाळण्यात आली. “आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा आम्ही खात्मा करू,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

सकाळपासून सुरू झालेल्या या बैठकीत अनेक ग्रामस्थांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी एकमुखाने टीपी योजनेला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. यापूर्वीच चिखली-कुदळवाडीच्या जमिनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या आहेत, महापालिकेच्या आरक्षणात मोठे क्षेत्र समाविष्ट झाले आहे, आणि स्वस्त घरकुलासाठी १०० एकर जमीन घेतली आहे. आता कुठे परिस्थिती स्थिर होत होती, तोच महापालिकेने टीपी योजना आणली आहे, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. या कारवाईला सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध करायचा आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायची तयारी दर्शवली आहे. “टीपी स्किम करून जर आम्हाला भूमिहीन करणार असाल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही,” असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

या बैठकीला जय भवानी प्रतिष्ठान चिखली अध्यक्ष जितेंद्र यादव ,भाजपचे युवा कार्यकर्ते दिनेश यादव, ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब यादव, लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, मराठा महासंघाचे उदय पाटील यांच्यासह युवराज पवार, दिलीप यादव, रमेश मोरे, दत्तूनाना मोरे, शैलेश मोरे, बाळासाहेब हरगुडे, गुलाबराव बालघरे, कोंडिबा यादव, विशाल बालघरे, कमालकर बालघरे, मनोज मोरे, दादासाहेब मोरे, गणेश यादव, नितेश मोरे, माऊली मोरे, सुदाम पवार, विशाल नेवाळे, तानाजी बालघरे, राहुल यादव, संभाजी यादव, दीपक ठाकूर, उत्तम बालघरे, किशोर बालघरे,  दिलीप मोरे, बाळासाहेब मोरे यांसारखे सुमारे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते.

आता या टीपी योजनेविरोधात कुदळवाडीचे ग्रामस्थ काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या गंभीर विषयावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!