news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड लोकशाही दिन: नागरिकांच्या समस्यांसाठी प्रशासनाची तत्परता!

पिंपरी-चिंचवड लोकशाही दिन: नागरिकांच्या समस्यांसाठी प्रशासनाची तत्परता!

अतिरिक्त आयुक्तांनी स्वीकारल्या नागरिकांच्या तक्रारी; अधिकाऱ्यांना दिले कार्यवाहीचे निर्देश!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका लोकशाही दिन: नागरिकांच्या समस्यांसाठी तत्परता!

पिंपरी, दि. ५ मे २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनात आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत नागरिकांकडून एकूण ३ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक २२ (काळेवाडी) येथील समस्या, लोकशाही दिनातील अर्ज आणि महत्त्वाच्या दूरध्वनी क्रमांकाचा फलक बसवण्यासंबंधी सूचनांचा समावेश होता. लोकशाही दिनाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

आजच्या लोकशाही दिनात नागरिकांनी शहरातील स्मशानभूमींचे सुशोभीकरण, उद्यानांचे सुशोभीकरण, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, नदीतील जलपर्णी काढणे, काळेवाडीत क्रीडांगणांची वाढ, जिजाऊ क्लिनिकमधील रुग्णांसाठी पत्र्याची शेड उभारणे, बसस्थानकाजवळ स्वच्छता राखणे आणि कोकणे नगरमधील रस्त्यांवरील ड्रेनेज गळती दुरुस्त करून डांबरीकरण करणे अशा विविध तक्रारवजा सूचना मांडल्या.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिका दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन उपक्रम राबवते. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, लोकशाही दिन समन्वयक उपआयुक्त राजेश आगळे, सह शहर अभियंता संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, किशोर ननवरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, विजय जाधव, किरण अंदुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता राजकुमार सुर्यवंशी, विकास घारे, मिनल दोडल, सागर देवकाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत सुपेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्यासह तक्रारदार नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाच्या आयोजनात लिपिक प्राजक्ता झेंडे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

लोकशाही दिनासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांना विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात. तक्रार अर्ज वैयक्तिक स्वरूपाचा असावा आणि तो अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे असावा. अर्जदाराने हा अर्ज लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी दोन प्रतींमध्ये नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे पाठवणे आवश्यक आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी थेट तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!