news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home मावळमहाराष्ट्र निगडीत पुन्हा जलवाहिनी फुटली! मेट्रो अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी!

निगडीत पुन्हा जलवाहिनी फुटली! मेट्रो अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी!

मेट्रोच्या कामात निष्काळजीपणा! वारंवार जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांमध्ये संताप!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडी, पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): निगडी परिसरात आज पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गाच्या कामादरम्यान भक्ति शक्ती उड्डाणपूल ते निगडी गावठाण रस्त्यावर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोर्टलँड मशीनने खोदकाम करत असताना महानगरपालिकेची जलवाहिनी फुटली.

यापूर्वीही याच ठिकाणी मेट्रोच्या कामादरम्यान दोन वेळा जलवाहिन्या फुटल्या होत्या. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई जाणवत असताना, मेट्रो ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी या घटनेवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वारंवार अशा घटना होऊनही मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे तातडीने मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर महापालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर निगडी परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या गंभीर घटनेमुळे मेट्रो प्रशासनाच्या कामाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. आता महापालिका आयुक्त या प्रकरणी तातडीने काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!