news
जागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड: दुर्बळ घटकांसाठी विशेष गट चर्चा आणि सर्वेक्षण!

पिंपरी-चिंचवड: दुर्बळ घटकांसाठी विशेष गट चर्चा आणि सर्वेक्षण!

शहर उपजिविका कृती आराखड्याअंतर्गत महापालिकेचा महत्त्वाचा उपक्रम!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड शहरात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका ‘शहर उपजीविका कृती आराखडा (C-LAP)’ तयार करत आहे. या अंतर्गत २१ व २२ मे २०२५ रोजी आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विशेष गट चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यात शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, खाजगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या महत्त्वपूर्ण चर्चासत्रातून मिळणारे अनुभव आणि सूचना C-LAP च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरतील. यानंतर, २६ ते ३१ मे या काळात शहरातील लोकसंख्या, कामगार, रोजगाराचे स्वरूप आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

शहर उपजिविका कृती आराखड्याचा उद्देश:

महापालिकेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना सक्षम करणे हा आहे. हा आराखडा केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (DAY-NULM) अंतर्गत तयार होत आहे. शहरांनुसार उपजीविकेच्या गरजा वेगळ्या असल्याने, उपलब्ध संसाधने, रोजगार क्षेत्र आणि भविष्यातील संधी विचारात घेऊन हा आराखडा तयार केला जाईल.

या कृती आराखड्यात शहराच्या सद्यस्थितीचे विश्लेषण आणि पुढील पाच वर्षांतील संधींचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, पतपुरवठा आणि कौशल्य विकास कार्यक्रमांची आखणी केली जाईल.

कृती आराखड्याची मुख्य वैशिष्ट्ये:

  • सद्यस्थितीचे विश्लेषण: लोकसंख्या, लिंग प्रमाण, कामगार, रोजगाराचे स्वरूप, दुर्बळ घटक यांचे विश्लेषण.
  • भविष्यातील गरजांचे विश्लेषण: आर्थिक वाढ, कुशल-अकुशल कामगारांची गरज, हरित अर्थव्यवस्था आणि नवीन रोजगार संधी.
  • अंमलबजावणी आराखडा: धोरणात्मक उद्दिष्ट्ये, योजना, महिलांसाठी स्वयंरोजगार, शासकीय-खाजगी भागीदारी आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर.

शहर उपजीविका कृती आराखड्यासाठी ‘शहर उपजीविका कृती दल’ (CLTF) स्थापन करण्यात आले आहे, ज्यात विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी सहभागी आहेत. हा आराखडा तयार झाल्यावर राज्य शासनाला सादर केला जाईल, ज्यामुळे शहरातील दुर्बळ घटकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!