news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home मुख्यपृष्ठराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय ट्रम्प यांचे पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य! भारताची चिंता वाढली?

ट्रम्प यांचे पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य! भारताची चिंता वाढली?

पाकिस्तानचं कौतुक, भारताच्या व्यापारी धोरणावर नाराजी; कर रद्द करण्याची ऑफरचा दावा!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वॉशिंग्टन (मॅक्स मंथन डेली न्यूज): अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे कौतुक करून भारताच्या व्यापारी धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लोक बुद्धिमान असून ते चांगल्या वस्तू तयार करतात, असे म्हटले आहे. पाकिस्तानच्या निर्यातीवर २९ टक्के कर लागण्याची शक्यता असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. दुसरीकडे, भारताच्या व्यापारी धोरणावर नाराजी व्यक्त करत, भारत जगात सर्वाधिक कर आकारणारा देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व कर रद्द करण्याची ऑफर दिली आहे, असा गौप्यस्फोटही ट्रम्प यांनी केला आहे. पाकिस्तान अमेरिकेला ५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त वस्तू निर्यात करतो, तर अमेरिका पाकिस्तानकडून २.१ अब्ज डॉलरच्या वस्तू आयात करतो, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्धविरामाची घोषणा झाली. त्यावेळीही ट्रम्प यांनी व्यापाराबाबत असाच दावा केला होता, मात्र भारताने तो फेटाळून लावला होता.

ट्रम्प यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!