news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home मावळमहाराष्ट्र उत्तर सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी सेलला नवा अध्यक्ष! दिलीप निंबाळकर यांची नियुक्ती!

उत्तर सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी सेलला नवा अध्यक्ष! दिलीप निंबाळकर यांची नियुक्ती!

मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उत्तर सोलापूर तालुका (मॅक्स मंथन डेली न्यूज) प्रतिनिधी पंडित गवळी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उत्तर सोलापूर तालुक्यात ओबीसी समाजाला अधिक बळ देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोंडी (उत्तर सोलापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप रामलाल निंबाळकर यांची उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, मोहोळचे आमदार राजू कारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, मोहोळ तालुकाध्यक्ष रणजित चवरे आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.

दिलीप रामलाल निंबाळकर यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव प्रा. नरेंद्र भोसले, लालासाहेब मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निंबाळकर यांच्या निवडीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यात ओबीसी समाजाच्या समस्यांना वाचा फुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ते पक्षाच्या ओबीसी सेलला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!