news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home गुन्हेगारी ‘पिंकी ताई’चा जाच! वैष्णवीला धमकावणारी नणंद कोण?

‘पिंकी ताई’चा जाच! वैष्णवीला धमकावणारी नणंद कोण?

थोरल्या जावेनं उघड केले करिश्मा हगवणेंचं सत्य!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तुझी बदनामी करेन!’ वैष्णवीला धमकावणारी ‘पिंकी ताई’ कोण? थोरल्या जावेनं उघड केले सत्य! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पुणे)

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली, हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. तर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अजूनही फरार आहेत.

दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या व्हॉट्सॲप चॅट आणि व्हॉइस नोट समोर आल्या आहेत. यामध्ये तिने सासरच्या त्रासाचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे, तिने ‘पिंकी ताई’ नावाच्या व्यक्तीकडून होणाऱ्या जाचाबद्दलही सांगितले होते. आता ही ‘पिंकी ताई’ कोण, याचा खुलासा झाला आहे. वैष्णवीची नणंद, जिचं खरं नाव करिश्मा हगवणे आहे, तिलाच घरात ‘पिंकी’ म्हणून ओळखलं जातं.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे, ती म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ, मयुरी जगताप हिने दिलेली साक्ष. मयुरीने नणंद करिश्मा म्हणजेच पिंकी ताईबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. मयुरीच्या म्हणण्यानुसार, घरातील सर्व निर्णय करिश्माच घेत असे. ती दोघा भावांपेक्षा (शशांक आणि सुशील) पाच वर्षांनी मोठी असल्याने घरात तिचीच सत्ता चालत होती.

मयुरीने सांगितले, “आमच्या घरात भाजी कोणती करायची, मी आणि वैष्णवीने कोणत्या साड्या नेसायच्या, याचे निर्णयदेखील नणंदच घेत होती. ‘पिंकी म्हणेल तीच पूर्व दिशा’ अशी घरात परिस्थिती होती.”

इतकंच नव्हे, तर घरातील लहान मुलांनी (सुसांनी) काय खायचं, कोणते कपडे घालायचे, हेसुद्धा करिश्माच ठरवत असे. घरातील आर्थिक व्यवहारही तीच सांभाळत होती. मयुरीच्या म्हणण्यानुसार, करिश्माला लग्न करायची इच्छा नाही आणि तिला हगवणे कुटुंबावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवायचे आहे. त्यामुळे ती सतत दोन्ही भावांच्या संसारात ढवळाढवळ करत असे. घरात तिला सगळे लाडानं पिंकी ताई म्हणतात, असं मयुरीने सांगितले.

वैष्णवीच्या व्हॉइस नोटमध्ये ‘तुझी बदनामी करेन’ अशी धमकी देणारी ही पिंकी ताई म्हणजेच करिश्मा हगवणे होती, हे आता स्पष्ट झाले आहे. घरातील या ‘अघोषित कर्त्याधर्त्या’मुळे वैष्णवीला किती मानसिक त्रास सहन करावा लागला असेल, याची कल्पनाही करवत नाही.

आता पोलीस या नवीन खुलाशांच्या आधारे पुढील तपास कसा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!