news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड मिलिंदनगर एसआरए प्रकल्प: पावसामुळे दुर्गंधी, कंपाउंड लावण्याची मागणी!

मिलिंदनगर एसआरए प्रकल्प: पावसामुळे दुर्गंधी, कंपाउंड लावण्याची मागणी!

युवा नेते सुहास कुदळेंचा पालिका प्रशासनाला इशारा. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मिलिंदनगर SRA प्रकल्प: पावसामुळे अस्वच्छता, सुरक्षेसाठी कंपाउंडची मागणी (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

पिंपरी: पिंपरीतील मिलिंदनगरमधील SRA प्रकल्प परिसरात पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. चिखल, साचलेले पाणी आणि कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युवा नेते सुहास कुदळे यांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुहास कुदळे यांनी पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पस्थळी पावसाचे पाणी साचल्याने खड्डे निर्माण झाले आहेत आणि याच ठिकाणी लहान मुले खेळतात. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थिती लक्षात घेता, संपूर्ण परिसरात पत्र्याचे कंपाउंड लावणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल.

सध्या सुरू असलेल्या प्रकल्पामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सुहास कुदळे यांनी केली आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!