news
Home पिंपरी चिंचवड हभप दत्तात्रय कुदळे यांना ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण’ पुरस्कार!

हभप दत्तात्रय कुदळे यांना ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण’ पुरस्कार!

कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी पिंपरी वाघेरे येथे भव्य सोहळा. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हभप दत्तात्रय कुदळे यांना ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण’ पुरस्कार जाहीर!

दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी पिंपरी वाघेरे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन; रक्तदान शिबिर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

पिंपरी, दि. ३ जून: पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, त्यानिमित्त शुक्रवारी (दि. ६) पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ३९ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सकाळी ९.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे विश्वस्त संजोग वाघेरे पाटील यांच्यासह सल्लागार अण्णा कापसे, सचिव बाळासाहेब वाघेरे, खजिनदार किसन वाघेरे, रमेश गोलांडे, बिपीन नाणेकर, अंकुश वाघेरे, जयवंत शिंदे तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, सकाळी ९ वाजता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल. याच वेळी, पिंपरी वाघेरे येथील ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना त्यांच्या समाजसेवेतील योगदानाबद्दल ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाईल.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पिंपरी चिंचवड शहर युवा सेना प्रमुख चेतन पवार, माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान आणि पिंपरी वाघेरे ग्रामस्थांनी केले आहे. हा सोहळा पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!