येलघोल बुद्ध लेणी धम्म सहल: इतिहास, स्वच्छता आणि एकतेचा अनोखा संगम!
पिंपरी ते येलघोल, मावळ: डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, लेणी संवर्धनासाठी जनसहभाग!
मावळ ,प्रतिनिधी: अजय यादव, (दि. ३० जुलै २०२५), मॅक्स मंथन डेली न्यूज : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ऐतिहासिक येलघोल बुद्ध लेणी येथे रविवार, २७ जुलै २०२५ रोजी आयोजित धम्म सहल विविध सामाजिक उपक्रमांसह यशस्वीरित्या संपन्न झाली. बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती, एकजूट लेणी प्रचार प्रसार समूह आणि एम बी सी पी आर टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सहलीने इतिहास, संस्कृती आणि सामाजिक कार्याचा अनोखा संगम साधला.
भीमसृष्टी पिंपरी ते तळेगाव दाभाडे: अभिवादन आणि प्रेरणेचा प्रवास

या धम्म सहलीची सुरुवात पिंपरी येथील ऐतिहासिक भीमसृष्टी येथून झाली. लेणी संवर्धकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देण्यात आली. येथे बुद्ध वंदना आणि सुत्तपठण करून सर्वांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, समोरील जागा घेण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित सदस्यांनी २०,००० रुपये या कार्यासाठी दान केले, हे जनसहभागाचे उत्तम उदाहरण आहे.
येलघोल लेणी येथे सामाजिक उपक्रमांची रेलचेल!

येलघोल बुद्ध लेणी परिसरात पोहोचल्यावर, प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर, लेणीच्या आत आणि बाहेरील परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. खराब झालेले काही बोर्ड दुरुस्त करून, लेणीच्या संपूर्ण माहितीचा फलक पुन्हा लावण्यात आला. यानंतर, मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
उपस्थित २०० हून अधिक सदस्यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना आणि सुत्तपठण घेण्यात आले.
मार्गदर्शन आणि ज्ञानाची पर्वणी

या कार्यक्रमाची प्रस्तावना मनोज गजभार (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी केली, तर सूत्रसंचालन सुरज सोनकांबळे (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक गौतम कदम (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी सर्वांना लेणीची सखोल माहिती समजावून सांगितली.
इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले:
- प्रफुल पुरलकर (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी महाराष्ट्रातील लेण्यांच्या निर्माण कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली.
- राजू भालेराव (पालीभाषा अभ्यासक, विविध लिप्यांचे अभ्यासक, लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी लेण्यांचे संवर्धन कसे करावे यावर अनमोल मार्गदर्शन केले.
- सारीश उर्फ दादुस डोळस (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी लेणी प्रचार-प्रसाराविषयी मार्गदर्शन केले.
- सुजाताताई नवघरे (पालीभाषा अभ्यासिका, विविध लिप्यांच्या अभ्यासिका, लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी आपल्या प्राचीन वारशाचे जतन कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
लेणी संवर्धकांना सतत मदत करणारे आणि येलघोल बुद्ध लेणी येथे आल्यानंतर सर्व व्यवस्था करणारे मार्गदर्शक राजेंद्र घारे यांनी लेणीपर्यंतच्या रस्त्याचे आणि लेणी परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने सुशोभीकरणाचे काम करण्यात येईल असे सांगितले. विकास खरात (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.
गावातील ग्रामस्थ विलास कदम आणि अजय कदम हे सतत लेणी आणि लेणी परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात, त्यांचेही कौतुक करण्यात आले.
जनसहभाग आणि कृतज्ञता

पिंपरी-चिंचवड, पुणे येथून निघालेल्या बसची नाश्त्याची व्यवस्था करणारे आणि येलघोल बुद्ध लेणी येथे आलेल्या सर्व सदस्यांची जेवणाची व्यवस्था करणाऱ्या दानदात्यांचे सर्व लेणी संवर्धकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
या धम्म सहलीस पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, आंध्र प्रदेश आणि बीड येथून २०० पेक्षाही जास्त सदस्य उपस्थित होते. प्रथमच पाली भाषा अभ्यासक डॉक्टर वैशाली सतीश जगताप, साळवी मॅडम, कडलक मॅडम, जयश्री भिगावडे, पो. भीमराव माने सर आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी कांबळे सर, महायान मसुरे तात्या, सुरेश वाघमारे, राहुल बनसोडे, रविंद्र शेगावकर, मंदाकिनीताई गायकवाड, संगीता ताई भंडारे यांनी विशेष प्रयत्न केले.
या यशस्वी आयोजनाबद्दल मनोज गजभार (लेणी प्रेमी, इतिहास प्रेमी) आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन!
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
