news
रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्तपुर्णा नगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुल
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडचे ‘सफाई सेवक’ शहराचे खरे हिरो: ‘अवकारिका’ चित्रपटातून त्यांच्या योगदानाला सलाम!

पिंपरी-चिंचवडचे ‘सफाई सेवक’ शहराचे खरे हिरो: ‘अवकारिका’ चित्रपटातून त्यांच्या योगदानाला सलाम!

स्वच्छ सर्वेक्षणातील यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांना; अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी चित्रपटाचे कौतुक केले. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सफाई सेवक हे शहराचे ‘खरे हिरो’ – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

‘अवकारिका’ चित्रपटाच्या विशेष शोमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव

पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५: “शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे सफाई सेवक हेच शहराचे खरे हिरो आहेत,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘अवकारिका’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

‘अवकारिका’ हा चित्रपट सफाई सेवकांचे रोजचे वास्तव, त्यांच्या कार्यांतील अडचणी, समाजातील अपप्रवृत्तींशी त्यांचा संघर्ष आणि स्वच्छतेसाठीचे समर्पण याचे प्रांजळ आणि प्रभावी चित्रण करतो. हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नसून, प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा एक अनुभव आहे, असे सांगत अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी चित्रपटाचे कौतुक केले.

स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी

या कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. ते म्हणाले, “शहर स्वच्छतेची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून, प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छता सेवकांच्या मेहनतीला समाजाने योग्य आदर दिला पाहिजे आणि नागरिकांनीही स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.”

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात ७ वा आणि महाराष्ट्रात १ वा क्रमांक मिळवला आहे. हे मोठे यश महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य झाले, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, अंकुश झिटे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!