news
Home पिंपरी चिंचवड ‘मिशन पिंपरी-चिंचवड’! भाजपची नवी ‘कार्यकारिणी’ सज्ज; काटे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

‘मिशन पिंपरी-चिंचवड’! भाजपची नवी ‘कार्यकारिणी’ सज्ज; काटे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

३०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन निवड; पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे उद्दिष्ट. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर

 

 

गणेशोत्सवाचे औचित्य साधून अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली घोषणा; प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न

 

२८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून, पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न सिताराम काटे यांनी विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचे शुभमुहूर्त साधत ही घोषणा केली आहे. पक्षातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा, अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे अध्यक्ष काटे यांनी म्हटले आहे.

तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन निवड

 

जिल्हा कार्यकारिणीची निवड करताना, अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ३०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच, स्थानिक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता आणि पक्षासाठी दिलेले योगदान विचारात घेऊनच ही कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या निवडीसाठी त्यांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, माजी जिल्हाध्यक्ष आमदारमहेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, आमदार उमाताई खापरे यांसारख्या मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संघटनात्मक पदांची संख्या मर्यादित असल्याने अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. मात्र, भविष्यात पक्षासाठी योगदान देणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला पदापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही अध्यक्ष काटे यांनी दिली आहे.


 

कार्यकारिणीतील प्रमुख पदे आणि पदाधिकारी

 

सरचिटणीस:

  • अॅड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे (संघटन)
  • विकास हरिश्चंद्र डोळस
  • मधुकर बहिरु बच्चे
  • वैशाली प्रशांत खाडये

वरिष्ठ उपाध्यक्ष:

  • काळुराम गोपाळ बारणे
  • अॅड. विनायक रमेश गायकवाड
  • तुषार रघुनाथ हिंगे
  • राम हनुमंत वाकडकर

युवा मोर्चा अध्यक्ष: दिनेश लालचंद यादव

महिला मोर्चा अध्यक्ष: सुजाता सुनील पालांडे

अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष: अनिल उर्फ बापु अभिमान घोलप

ओबीसी मोर्चा अध्यक्ष: चेतन हुशार भुजबळ

सोशल मीडिया सेल अध्यक्ष: सागर नंदकिशोर बिरारी

कोषाध्यक्ष: हेमचंद्र शंकरराव मासुळकर

कार्यालय प्रमुख: संजय अंबादास परळीकर

सहकार आघाडी: सुनील मारुती कुंजीर

व्यापारी आघाडी अध्यक्ष : राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे

कायदा आघाडी अध्यक्ष :अॅड. गोरख भागवत कुंभार

सोशल मीडिया सेल अध्यक्ष : सागर नंदकिशोर बिरारी

ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष : सुनिल दिगंबर लांडगे

सांस्कृतिक सेल अध्यक्ष : विजय बबनराव भिसे

जेष्ठ कार्यकर्ता सेल : विजय शिनकर

माजी सैनिक सेल : देविदास रघुनाथ साबळे

आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट : जयंत उर्फ आप्पा बागल

आयुष्मान भारत सेल: गोपाळ काशीनाथ माळेकर

बेटी बचाव बेटी पाढाओ प्रकोष्ट: प्रीती प्रणव कामतीकर

अभियंता प्रकोष्ट: संतोष भालेराव

चार्टर्ड अकाऊंटंट सेल: बबन सोपान डांगले

दिव्यांग सेल: अंकुश यशवंत शिर्के

वैद्यकीय प्रकोष्ट: डॉक्टर अमित वामन निमाने

गृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ: प्रदीप बबनराव बेंद्रे

वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ट: हरीश भिकोबा मोरे

मन की बात संयोजक: नंदकुमार मारुती दाभाडे

 

यासोबतच विविध आघाड्या, सेल आणि सदस्य पदांवर इतर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. ही नवीन कार्यकारिणी पक्षाला अधिक बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!