news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अमरावती २० लाख शेतकऱ्यांसाठी थेट मदत! – अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज

२० लाख शेतकऱ्यांसाठी थेट मदत! – अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज

बँकांना कर्ज वसुलीसाठी निधी वळवता येणार नाही; महसूल व वन विभागाकडून ४ नोव्हेंबरला शासन निर्णय निर्गमित. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ₹ २,०३४ कोटीचा मदत निधी मंजूर

 


 

प्रति हेक्टरी ₹ १० हजार (३ हेक्टर मर्यादेत); विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ आणि ‘फार्मर आयडी’ नोंदणी करण्याचे आवाहन

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ६ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ₹ २,०३४ कोटी ४३ लाख ४६ हजार इतका अतिरिक्त मदत निधी मंजूर केला आहे. रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी आणि इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी १० हजार रुपये (३ हेक्टरच्या मर्यादेत) या दराने ही मदत दिली जाणार आहे.

महसूल व वन विभागाने ४ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिली.

 

राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील २० लाख ८६ हजार ४४५ शेतकऱ्यांना या मदतनिधीचा लाभ होणार आहे.

डॉ. श्वेता सिंघल यांनी विभागातील शेतकरी बांधवांना या मदत प्राप्तीसाठी तातडीने स्वत:च्या बँक खात्याची ई-केवायसी (e-KYC) तसेच फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

  • वितरणाची पद्धत: सदर मदत निधी हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) पोर्टलव्दारे वितरीत केला जाणार आहे.
  • महत्त्वाची सूचना: नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदत निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
  • अचूक कार्यवाही: कार्यान्वयन यंत्रणांनी सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमून्यात काळजीपूर्वक तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी.

 

जिल्हा बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र (हेक्टर) मंजूर निधी (रु. लक्ष)
अमरावती २,२४,९१५ १,८६,९०२.५ १८६९०.२५
अकोला ३,५६,२२९ ३,२३,४९६.८८ ३२३४९.६८
यवतमाळ ५,२३,३४५ ६,३८,१५८.१० ६३८१५.८२
बुलढाणा ६,८५,३३८ ६,१०,५७२.८० ६१०५७.२८
वाशिम २,९६,६१८ २,७५,३०४.३२ २७५३०.४३
एकूण २०,८६,४४५ २०,३४,४३४.६० २०३४४३.४६

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!