news
Home पिंपरी चिंचवड बिरसा मुंडा: स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त आणि समाजसुधारक! उप आयुक्त अण्णा बोदडे यांचे भावी पिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन

बिरसा मुंडा: स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त आणि समाजसुधारक! उप आयुक्त अण्णा बोदडे यांचे भावी पिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन

माजी नगरसदस्या उषा मुंढे, आशा सुपे, प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह आनंद भवारी, डॉ. संतोष सुपे आणि सर्व मान्यवरांनी क्रांतिवीरांना केले विनम्र अभिवादन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘उत्साही’ अभिवादन!

 

जल-जंगल संवर्धनासाठी मुंडांच्या व्यापक चळवळीतून प्रेरणा घेण्याचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांचे प्रतिपादन.

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती आज, शुक्रवार (दि. १५ नोव्हेंबर २०२५) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा हे स्वातंत्र्यसैनिक, प्रखर देशभक्त आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक देखील होते. त्यांच्या देशप्रेम, सामाजिक कार्य आणि विचारांतून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी.”

उप आयुक्त अण्णा बोदडे पुढे म्हणाले की, “त्यांच्या संघर्षाची परंपरा आपल्याला समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते, तसेच जल व जंगल संवर्धनासाठी त्यांनी उभारलेल्या व्यापक चळवळीने समाजाला चालना मिळाली.”

यावेळी माजी नगरसदस्या उषा मुंढे, आशा सुपे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आदिवासी सांस्कृतिक मंडळाचे (पुणे) अध्यक्ष आनंद भवारी, डॉ. संतोष सुपे, अण्णा शेळके, विष्णू गवारी, बाळासाहेब सुपे, सतीश लेंभे, पांडुरंग तळपे, दत्तात्रय कोकाटे, गौरी गोणरे, संगीता दगडे तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!