news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण स्मारकाजवळ ३८,३४० नागरिकांनी घेतली ‘निर्भयपणे मतदान’ करण्याची प्रतिज्ञा!

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण स्मारकाजवळ ३८,३४० नागरिकांनी घेतली ‘निर्भयपणे मतदान’ करण्याची प्रतिज्ञा!

आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह सर्व मान्यवरांचा सहभाग; निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये विक्रमी ‘मतदान शपथ’! ३८,३४० जणांनी एकाचवेळी मतदान करण्याचा केला निर्धार

 

रिव्हर सायक्लोथॉन २०२५ स्पर्धेत मतदारांमध्ये जनजागृती; आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वीप उपक्रमाला मोठे यश

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत महापालिकेने आज (रविवार, २३ नोव्हेंबर २०२५) मतदान जनजागृतीचा एक विक्रमी उपक्रम यशस्वी केला. मोशी येथील जगातील सर्वात मोठ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकाला मानवंदना देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धेदरम्यान तब्बल ३८,३४० जणांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी मतदान करण्याची शपथ घेऊन आपला निर्धार व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, डब्ल्यूटीई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी महापालिकेने स्वीप उपक्रमांतर्गत हा विशेष ‘मतदान शपथ’ उपक्रम घेतला.

हा उपक्रम महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांच्यासह महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त शिवाजी पवार, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, माजी नगरसदस्य आणि माजी नगरसदस्या, महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक यांच्यासह तब्बल ३८ हजार ३४० स्पर्धक आणि नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते.

जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले. उपस्थितांनी घेतलेली ‘मतदान शपथ’ खालीलप्रमाणे होती:

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”

महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी यावेळी मतदारांना महत्त्वाचे आवाहन केले.

श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा प्रशासक म्हणाले, “राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता स्वीप उपक्रमांतर्गत स्वीप व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून, या कक्षांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येत्या निवडणुकीत शहरातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!