news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर मधुकर पवळे यांच्या कार्यास कृतज्ञता; निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर मधुकर पवळे यांच्या कार्यास कृतज्ञता; निगडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

माजी नगरसदस्या सुमन पवळे, अजित गव्हाणे, उपायुक्त अण्णा बोदडे, सह शहर अभियंता बापू गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माजी महापौर मधुकर पवळे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन; निगडीसह मुख्य प्रशासकीय इमारतीत श्रद्धांजली!

 

पुण्यतिथीनिमित्त महापालिकेकडून भावपूर्ण कार्यक्रम; शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५) महापालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह आणि निगडी येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमात माजी महापौर मधुकर पवळे यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी नगरसदस्या सुमन पवळे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मधुकर पवळे यांचे नातेवाईक अनिता लांडे, सुनिता चोरघे, रेणुका उत्तेकर, ज्योती गवारे, राजलक्ष्मी चोरघे, ओंकार पवळे, विनीत गवारे, सिद्धिराम शिरसाईल आदी मान्यवर उपस्थित होते.

यासोबतच, निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुतळ्यास सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

निगडी येथील कार्यक्रमाला माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, पंकज बगाडे, राजाराम राऊत, भिकाजी केंजळे, लहू धुमाळ, सचिन रोमन, तुकाराम राऊत, राजाराम लोंढे, विनीत गवारे, विनायक चोरघे यांच्यासह पवळे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!