news
Home अमरावती अमरावती जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! आयुष्मान योजनेच्या गोल्डन कार्डची नोंदणी होणार गतीने; शिधा पत्रिकेतील नाव अद्ययावत करण्याचे नागरिकांना आवाहन

अमरावती जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! आयुष्मान योजनेच्या गोल्डन कार्डची नोंदणी होणार गतीने; शिधा पत्रिकेतील नाव अद्ययावत करण्याचे नागरिकांना आवाहन

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्या उपस्थितीत बैठक; निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे यांचा सन्मान. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गोल्डन कार्डसाठी डिसेंबरमध्ये अमरावतीत ‘विशेष मोहीम’! कार्ड नोंदणीसाठी आशा सेविकांना वाढीव मानधन

 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची माहिती; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. २९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पात्र नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘गोल्डन कार्ड’ (Golden Card) काढण्याची प्रक्रिया अमरावती जिल्ह्यात गतिमान केली जाणार आहे. या कार्डाची नोंदणी आणि वितरण जलदगतीने व्हावे यासाठी संपूर्ण डिसेंबर महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणीसंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

गोल्डन कार्ड काढण्याची जबाबदारी प्रामुख्याने आशा सेविकांवर सोपवण्यात आली आहे. या कामात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले:

  • मानधन वाढ: आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी २० रुपये तर वितरणासाठी १० रुपये मानधन मिळणार आहे.

  • लॉगइन आयडी: येत्या दोन दिवसांत आशा सेविकांचे लॉगइन आयडी सक्रिय करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  • याद्या पुरवणार: नोंदणीचे काम गतीने होण्यासाठी आशांना लाभार्थ्यांच्या याद्या पुरविण्यात येणार आहेत, जेणेकरून लक्ष्य साधणे सोपे होईल.

डिसेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत नोंदणीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

  • नोंदणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाईल.

  • या योजनेत रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील ५१ रुग्णालये अंगीकृत (Emplenelled) असून, येथे नागरिकांना निःशुल्क उपचार करण्यात येतात.

  • शिधा पत्रिकेवर या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याने, शिधापत्रिकेत नाव नसणाऱ्या नागरिकांनी ते तातडीने अद्ययावत करावे. शिधापत्रिकेत नाव अद्ययावत झाल्यानंतर ६० दिवसांत लाभार्थ्यांचे नाव यादीत येणार आहे.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आयुष्मानच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.

यावेळी गोल्डन कार्ड नोंदणीच्या कामात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल साम्बरकर, सिमा सोनोने, गिता गावंडे, इंदिरा मोहोड, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात, सुनिता चौरकर यांचा समावेश होता.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!