news
Home पिंपरी चिंचवड ५०० मीटरचा रस्ता दीड तासांत पार! पिंपळे गुरवच्या सृष्टी चौकात अपघातांची मालिका सुरू; सिग्नल यंत्रणा तातडीने बसवण्याची मागणी

५०० मीटरचा रस्ता दीड तासांत पार! पिंपळे गुरवच्या सृष्टी चौकात अपघातांची मालिका सुरू; सिग्नल यंत्रणा तातडीने बसवण्याची मागणी

कासारवाडी, औंध आणि बीआरटीएस रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे चौकात मोठा गोंधळ; स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि रहिवाशांचा अरुण पवार यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा. (© २०२५ कासारवाडी, औंध आणि बीआरटीएस रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे चौकात मोठा गोंधळ; स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि रहिवाशांचा अरुण पवार यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.) )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे गुरवचा ‘सृष्टी चौक’ ठरला वाहतूक कोंडीचा नवा हॉटस्पॉट; नित्याच्या अपघातांमुळे सिग्नल बसविण्याची तीव्र मागणी

 

मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अरुण पवार यांचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांना निवेदन; चाकरमान्यांना ५०० मीटरसाठी लागतोय दीड तास

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज::

पिंपळे गुरव परिसरातील महत्त्वाचा चौक असलेला ‘सृष्टी चौक’ सध्या नित्याच्या वाहतूक कोंडी आणि अपघातांचे केंद्र बनला आहे. या गंभीर समस्येमुळे चाकरमान्यांना अवघ्या ५०० मीटर अंतरासाठी तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे या चौकात तातडीने वाहतूक नियंत्रक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अरुण पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजाभवानी मंदिर ते वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्यादरम्यान असलेल्या सृष्टी चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

या रस्त्याचा वापर औंध, सांगवीतून पिंपरी आणि पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस, रिक्षा, पीएमपीएमएल बसेस आणि दुचाकीस्वार यांचा या रस्त्यावर मोठा वावर असतो.

सृष्टी चौकात चारही बाजूंनी वाहने येतात:

  1. कासारवाडीकडून येणारी वाहने

  2. जगताप पेट्रोल पंपाकडून येणारी वाहने

  3. सांगवी, औंधकडून येणारी वाहने

  4. वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्यावरून पिंपळे गुरवकडे येणारी वाहने

या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. परिणामी, येथे किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात वारंवार घडत आहेत.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सृष्टी चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासोबतच वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करणे अत्यंत आवश्यक बनले आहे, असे अरुण पवार यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाने या महत्त्वपूर्ण मागणीवर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अरुण पवार यांनी केलेली ही मागणी योग्यच असल्याचे मत व्यक्त करत, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि रहिवाशांनी त्यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!