news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अमरावती अमरावती-डवरगाव रस्त्यावर महसूल विभागाचा छापा! ५ अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे हायवा मुद्देमालासह जप्त

अमरावती-डवरगाव रस्त्यावर महसूल विभागाचा छापा! ५ अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे हायवा मुद्देमालासह जप्त

उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांच्या पथकाची मोठी कारवाई; अवैध गौण खनिज उपशाला बसणार आळा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक! अमरावतीत ५ हायवा ट्रक जप्त

 

 

जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणीता चापले यांच्यासह पथकाची रात्रीची गस्त; पाचही हायवा पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने सोमवारी रात्री (दिनांक २ डिसेंबर २०२५) मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध रेतीची वाहतूक करणारे पाच हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून, ते पुढील कार्यवाहीसाठी अमरावती तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत.

अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून भरारी पथकांद्वारे वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणीता चापले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांचे पथक अमरावती-डवरगाव रस्त्यावर गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली.

वाहन तपासणी दरम्यान, पथकाला एमएच २७ डीटी ९३६६, एमएच २७ डीटी ६४९४, एमएच २७ डीटी ४५५५, एमएच २७ डीएल ६४९४ आणि एमएच २७ डीटी १४८० क्रमांकाचे हायवा ट्रक अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना आढळून आले. पथकाने पाचही ट्रक मुद्देमालासह तातडीने जप्त केले.

सदर कारवाईत मंडळ अधिकारी सुनील उगले, गजानन हिवसे, ग्राम महसूल अधिकारी सुनील भगत, हेमंत गावंडे, रामकृष्ण इंगळे, पवन बोंडे, रामदास गोडे आणि पोलीस यांनी सहभाग घेतला.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!